शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:18 IST

व्हिडीओ रिट्विट करत दिग्विजय सिंह यांचा पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणून त्याबद्दल संशय व्यक्त करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपानं सडकून टीका केली. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिग्विजय यांच्यावर तोफ डागली. या टीकेला आता दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तुमच्याच एका वरिष्ठ नेत्यानं पुलवामातील हल्ल्याला अपघात म्हटलं होतं. याबद्दल मोदीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचं काय म्हणणं आहे, असा सवाल दिग्विजय यांनी ट्विटमधून उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. यामध्ये मौर्य यांनी पुलवामातील हल्ल्याचा उल्लेख 'मोठी दुर्घटना' असा केला आहे. या व्हिडीओवरुन दिग्विजय यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांना लक्ष्य केलं. 'मी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हटल्यावर मोदीजींपासून त्यांच्या तीन मंत्र्यांपर्यंत सगळेजण मला पाकिस्तानचा समर्थक म्हणू लागले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचं विधान ऐका. मोदीजी आणि त्यांच्या मंत्र्यांना याबद्दल काही म्हणायचं आहे का?' असा सवाल त्यांनी ट्विटमधून विचारला आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. सीआरपीएफचे अडीच हजार जवान बसेसमधून श्रीनगर जात असताना दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला. ताफ्यातील एका बसला स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं धडक दिली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर देशभरात संतापाची लाट होती. या हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला हवाई दलानं मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याचे पुरावे मागितल्यानं सध्या दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपानं टीकेची झोड उठवली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाDigvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपा