हाच भाजपाचा न्याय आहे का?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 08:55 AM2019-09-27T08:55:21+5:302019-09-27T09:06:54+5:30

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

"BJP's Justice?": Priyanka Gandhi On Woman Arrested In Chinmayanand Case | हाच भाजपाचा न्याय आहे का?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हाच भाजपाचा न्याय आहे का?; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्दे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. हाच भाजपाचा न्याय आहे का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. शाहजहानपूर प्रकरणात पीडितेला अटक करण्यात आली आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप या तरुणीवर ठेवण्यात आला आहे. तरुणीला अटक करण्यात आल्यानंतर हाच भाजपाचा न्याय आहे का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. प्रियंका यांनी याबाबत ट्विट केले आहे. 

विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजपा नेते चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक  छळाचा आरोप केल्याने खळबळ उडाली. तसेच बलात्काराचा आरोप झालेले भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या विधी महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थिनीला एसआयटीने अटक केली. तिच्यावर चिन्मयानंद यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरून प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडित तरुणाच्या वडिलांची हत्या करण्यात आली. काकांना अटक करण्यात आली. त्यानंतर जनक्षोभाचा उद्रेक झाला आणि 13 महिन्यांनंतर आरोपी आमदाराला अटक करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच शाहजहानपूर प्रकरणात पीडितेला अटक करण्यात आली आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी ट्वीटमध्ये केला आहे.

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर अक्षरश: रडण्याची वेळ आली. खातेदारांना या बँकेतून पुढील किमान सहा महिने एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता येणार नाहीत. थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. यावरूनच प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांनी बुधवारी (25 सप्टेंबर ) पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत अकाऊंट असणाऱ्या एका महिलेचा रडतानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे. तसेच सरकारची चूक आहे मात्र त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे असं म्हणत याआधीही प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला होता.  

 

Web Title: "BJP's Justice?": Priyanka Gandhi On Woman Arrested In Chinmayanand Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.