शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे २०१८-१९चे उत्पन्न २,४१० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 05:36 IST

भारतीय जनता पक्षाचे वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचे उत्पन्न २,४१० कोटी, तर २०१७-२०१८ वर्षात ते १,०२७ कोटी रुपये होते.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचे उत्पन्न २,४१० कोटी, तर २०१७-२०१८ वर्षात ते १,०२७ कोटी रुपये होते. उत्पन्न वाढीचा हा वेग तब्बल १३४ टक्के आहे. २०१८-२०१९ वर्षासाठीच्या आपल्या वार्षिक अंकेक्षण (आॅडिट) अहवालात भाजपने हे उत्पन्न घोषित केले असून निवडणूक आयोगाकडेही हा अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की, या उत्पन्नात १,४५० कोटी रुपये हे इलेक्टोरल बाँडस्द्वारे मिळालेले आहेत.भाजपने २०१७-२०१८ वर्षात आम्हाला २१० कोटी रुपये इलेक्टोरल बाँडस्द्वारे मिळाल्याचे म्हटले होते. २०१८-२०१९ वर्षात एकूण खर्च हा १००५ कोटी रुपये झाल्याचे पक्षाने म्हटले. २०१७-२०१८ वर्षात हा खर्च ७५८ कोटी रुपये होता. खर्चातील ही वाढ ३४ टक्के आहे.काँग्रेसला २०१८-२०१९ वर्षात ९१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर ४७० कोटी रुपये खर्च झाला, असे अंकेक्षण अहवालात म्हटले आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २०१८-२०१९ वर्षात काँग्रेसला ३८३ कोटी रुपये इलेक्टोरल बाँडस्द्वारे मिळाले. २०१७-२०१८ वर्षात काँग्रेसला या बाँडस्द्वारे अवघे पाच कोटी रुपये मिळाले होते.>काय म्हटले आहे तपशिलात?वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचा वार्षिक उत्पन्न व खर्चाचा तपशील भाजपने ३१ मार्च, २०१९ रोजी दाखल केला असून त्यात २,४१० कोटी रुपये शुल्क आणि वर्गणीतून (१.८९ कोटी रुपये) मिळाले आहेत. ऐच्छिक योगदान (इलेक्टोरल बाँडस्सह २३५४ कोटी रुपये), बँकेतून मिळालेले व्याज (५४ कोटी रुपये) आणि इतर उत्पन्न (२४ लाख रुपये).ऐच्छिक योगदानातून म्हणजे आजीवन सहयोग निधीतून २४.६४ कोटी रुपये, मोर्चे व बैठकांतून अनुक्रमे ६८ आणि ९३ लाख रुपये, इलेक्टोरल बाँडस्द्वारे १४५०.८९ कोटी आणि इतर योगदानातून ८७६.८७ कोटी रुपये मिळाल्याचे भाजपने म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपा