शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचं गुजरात मॉडल... मराठी खासदाराने फोटो शेअर करत साधला मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 09:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्याचा चांगला विकास केल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. गुजरात मॉडलचा दाखला देत भाजपाने नरेंद्र मोदींना प्रमोट केलं, त्याच धर्तीवर भाजपाप्रणित आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना घषितही केले.

ठळक मुद्देराजीव सातव यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी, काहींनी सातव यांना घरचा रस्ता दाखवला आहे, म्हणजेच तुमच्या मतदारसंघातील रस्ते पाहा, असा सल्लाही दिलाय.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीगुजरात मॉडलचं ब्रँडींग करत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता खेचून आणली. याच मॉडेलच्या आधार घेत गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. त्यामुळे, गुजरात मॉडलवरुन मोदींना सातत्याने काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात येते. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावावरुन गुजरात मॉडलचा उल्लेख करत टीका केली होती. आता, पावसाळ्यात गुजरातमधील रस्त्यांची दूरवस्था पाहून गुजरातचे काँग्रेस प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी मोदी सरकारला टार्गेट केलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्याचा चांगला विकास केल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. गुजरात मॉडलचा दाखला देत भाजपाने नरेंद्र मोदींना प्रमोट केलं, त्याच धर्तीवर भाजपाप्रणित आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना घषितही केले. याच, गुजरात मॉडलचा आधार घेऊन प्रचार आणि प्रसार करण्यात आला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मोदींच्या गुजरात मॉडेलचे जाहीर सभांमधून कौतुक केले होते. तेथील रस्ते, पथदिवे, नागरी सुविधांचा मोठ्या प्रमाणात ढोल पिटण्यात आला होता. मात्र, हे गुजरात मॉडल मला भासविण्यात आल्याचंही राज यांनी नंतर स्पष्ट केलं. आता, काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत 'भाजपा का गुजरात मॉडल', असं कॅप्शन दिलंय. 

राजीव सातव यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी, काहींनी सातव यांना घरचा रस्ता दाखवला आहे, म्हणजेच तुमच्या मतदारसंघातील रस्ते पाहा, असा सल्लाही दिलाय. काहींनी महाराष्ट्र मॉडल पाहा, अशाही सूचना केल्या आहेत. तर, काहींनी राजीव सातव यांच्या फोटोला अनुसरुन गुजरात मॉडल फसवे असल्याचंही म्हटलंय.  

राहुल गांधींनीही केली होती टीका

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकार आणि गुजरात मॉडेलवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्गामुळे होणारा मृत्यूदर हा गुजरात राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करत ‘गुजरात मॉडेल’ फेल गेल्याचे राहुल गांधींनी म्हटले. गुजरात राज्यातील तुलना काँग्रेस शासित राज्यांशी करत राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यूदर गुजरातमध्ये 6.25, महाराष्ट्र 3.73%, राजस्थान 2.32%, पंजाब 2.17%, पुडुचेरी 1.98%, झारखंड 0.5% आणि छत्तीसगढ 0.35% इतका आहे''. त्यामुळे या आकडेवारीकडे पाहता कोरोना  संकटापुढे 'गुजरात मॉडेल' अयशस्वी झाल्याचे दिसत होते. 

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीRajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसTwitterट्विटरroad transportरस्ते वाहतूक