शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आज भाजपची पाचवी यांदी जाहीर होण्याची शक्यता; PM मोदींच्या उपस्थितीत मंथन, 5 राज्यांत यांना मिळू शकतं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:46 IST

Lok Sabha Elections 2024: या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पाचव्या यादीतील उमेदवारांसंदर्भात चिंतन करण्यात आले. माध्यमांतील वृत्तांनुसार महाराष्ट्र आणि बिहारसंदर्भात पक्ष्याच्या सीईसीच्या पुढील बैठकीत चर्चा होऊ शकते.

लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे घोषित केले जात आहेत. यातच आज भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपही आपल्या उमेदवारांची पाचवी यादी आज रविवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओडिशा आणि आंध्र प्रदेश, अशा पाच राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर केले जाऊ शकतात. यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या मुख्यालयात जवळपास 3 तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली.   या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पाचव्या यादीतील उमेदवारांसंदर्भात चिंतन करण्यात आले. माध्यमांतील वृत्तांनुसार, उत्तर प्रदेशातील राहिलेल्या 24 जागांपैकी 10 जागांसाठी नावे निश्चित करण्यात आली आहेत. यात गाझियाबादमधून अतुल गर्ग मेरठमधून अरुण गोविल तर मुरादाबादमधून कुंवर सर्वेश सिंह यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

ओडिशातील जागांवरही चर्चा, या दिग्गजांचे तिकीट जवळपास पक्के -   ओडिशा भाजपाध्यक्ष मनमोहन सामल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत ओडिशातील लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्य 147 जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर मंथन झाले. माध्यमांतील वृत्तांनुसार, पुरी येथून संबित पात्रा, संभलपूरमधून धर्मेद्र प्रधान, आणि भुवनेश्वर येथून अपराजिता सारंगी यांना तिकीट मिळू शकते. महत्वाचे म्हणजे, ओडिशामध्ये भाजप आणि बीजू जनता दल (बीजद) यांच्या युतीची चर्चा होती. मात्र ती होऊ शकली नाही. या बैठकीत राजस्थानातील 8 जागा आणि पश्चिम बंगालमधील उरलेल्या सर्व जागांवरही चर्चा झाली. मात्र, तीन जागांवर अद्याच विचार झालेला नाही.

महाराष्ट्रासह या राज्यावर पुढच्या बैठकीत चर्चा -महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र आणि बिहारसंदर्भात पक्ष्याच्या सीईसीच्या पुढील बैठकीत चर्चा होऊ शकते. तत्पूर्वी,  भाजपने आतापर्यंत 291 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह आणि नितिन गडकरी यांच्यासह पक्षातील काही महत्वाच्या नेत्यांची नावे यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहेत. यावेळीही लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा