भाजपचा व्यापक कार्यक्रम! सहा महिन्यांत तयार करणार तब्बल ५० लाख प्रशिक्षित कार्यकर्ते

By यदू जोशी | Updated: April 11, 2026 10:14 IST2026-04-11T10:13:38+5:302026-04-11T10:14:23+5:30

डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील पहिलाच पक्ष

BJP's comprehensive program 50 lakh trained workers to be prepared in six months | भाजपचा व्यापक कार्यक्रम! सहा महिन्यांत तयार करणार तब्बल ५० लाख प्रशिक्षित कार्यकर्ते

भाजपचा व्यापक कार्यक्रम! सहा महिन्यांत तयार करणार तब्बल ५० लाख प्रशिक्षित कार्यकर्ते

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय जनता पक्षाने येत्या सहा महिन्यांत ५० लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. पक्षाबाबतची माहिती या प्लॅटफॉर्मवर विस्ताराने दिली जाईल आणि त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची ऑनलाइन उत्तरे द्यावी लागतील.

भाजपने पक्षांतर्गत प्रशिक्षणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीतील पक्ष मुख्यालयात देशभरातील अडीचशे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी शुक्रवारी घेतली. या बैठकीत राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आदीनी मार्गदर्शन केले. प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्षांसह नऊ जण या बैठकीला उपस्थित होते.

भाजपचे देशभरात १४ कोटी ५८ लाख प्राथमिक सदस्य आहेत. त्यातील साडेतीन कोटी सदस्य असे आहेत की ज्यांच्यावर पक्षाची काहीतरी जबाबदारी आहे. या साडेतीन कोटी सदस्यांना पक्षाची विस्तृत माहिती असावी यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे.

भाजपच्या आधी असलेला जनसंघ, त्याचा प्रवास, पक्षाची वैचारिक बैठक काय आहे, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, पक्षाची शिस्त, थोर नेत्यांबाबतची माहिती या प्लॅटफॉर्मवर दिली जाईल आणि त्या आधारे प्रश्न विचारले जातील, ज्याची उत्तरे देत कार्यकर्ते घरबसल्या प्रशिक्षित होतील. देशात कोणत्याही राजकीय पक्षाने पहिल्यांदाच अशी प्रशिक्षण योजना आणली आहे.

शिस्तीवर ठेवले बोट

देशभरात सध्या भाजपची निवासी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. त्या बाबतचा आढावा घेताना नितीन नबीन यांनी पक्षात बिघडलेल्या शिस्तीवर बोट ठेवले. अनेक प्रशिक्षण शिबिरांत कार्यकर्ते पाय पसरून आरामात बसले होते, हे काही फोटोंमध्ये दिसले, ही खेदाची बाब आहे. प्रशिक्षण हा विषय आपण किती गांभीर्याने घेतो हे त्यावरून दिसते, अशी कानउघाडणी त्यांनी केली.

फडणवीस यांचे कौतुक

प्रशिक्षणात मुख्यमंत्र्यांचा कसा सहभाग असावा याचे देवेंद्र फडणवीस हे उत्तम उदाहरण आहेत असे कौतुक बी. एल. संतोष यांनी बैठकीत केले तर प्रशिक्षण वर्गांमध्ये महिलांची संख्या समान असणे अपेक्षित आहे पण अनेक ठिकाणी ती नगण्य असल्याबद्दल नितीन नबीन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title : भाजपा का व्यापक कार्यक्रम! छह महीने में 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ता!

Web Summary : भाजपा ने डिजिटल प्लेटफॉर्म के माध्यम से छह महीने में 50 लाख कार्यकर्ताओं को प्रशिक्षित करने का लक्ष्य रखा है। प्लेटफॉर्म पार्टी के इतिहास, विचारधारा और अपेक्षाओं की जानकारी देगा, साथ ही ऑनलाइन मूल्यांकन भी होगा। राष्ट्रीय नेताओं ने पार्टी अनुशासन और प्रशिक्षण कार्यक्रमों में महिलाओं की भागीदारी पर जोर दिया।

Web Title : BJP to Train 5 Million Workers in Six Months!

Web Summary : BJP aims to train 5 million workers in six months using a digital platform. The platform will provide information about the party's history, ideology, and expectations, with online assessments. National leaders emphasized party discipline and women's participation in training programs.