शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे बीएस येडीयुराप्पा अडचणीत; 17 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोक्सो दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 08:44 IST

yediyurappa POCSO Case: २ फेब्रुवारीचा हा प्रकार असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते बीएस येडीयुराप्पा यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका १७ वर्षांच्या मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 

येडीयुराप्पा यांच्याकडे फसवणुकीच्या एका प्रकरणात एक महिला आणि तिची १७ वर्षांची मुलगी मदत मागण्यासाठी आली होती. यावेळी येडीयुराप्पा यांनी या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. २ फेब्रुवारीचा हा प्रकार असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे. 

येडीयुराप्पा यांच्याविरोधात बंगळुरुच्या सदाशिवनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळीच हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोक्सो (लैंगिक अत्याचार) कलम 8 आणि कलम 354 ए (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

येडीयुराप्पांवर गुन्हा दाखल होताच कर्नाटकातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांच्याशी चर्चा करून आयुक्त माघारी निघाले आहेत. 

येडीयुराप्पांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया...

बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या महिलेने आजपर्यंत दाखल केलेल्या 53 प्रकरणांची यादी जारी केली आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने तक्रारदार महिलेला अशा तक्रारी दाखल करण्याची सवय असल्याकडे लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाPOCSO Actपॉक्सो कायदाBJPभाजपाKarnatakकर्नाटक