भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष; राष्ट्रपतींकडून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 08:47 PM2024-06-20T20:47:38+5:302024-06-20T20:47:57+5:30

१८ व्या लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असणार यावरून सुरु असलेल्या चर्चांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशन सुरु करण्यासाठी भाजपाचे खासदार ...

BJP's Bhartruhari Mahtab as Lok Sabha protem speaker; appointed by President Droupadi Murmu  | भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष; राष्ट्रपतींकडून नियुक्ती

भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष; राष्ट्रपतींकडून नियुक्ती

१८ व्या लोकसभेचे अध्यक्षपद कोणाकडे असणार यावरून सुरु असलेल्या चर्चांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशन सुरु करण्यासाठी भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. 

कटकचे भाजप खासदार भर्तृहरी महताब हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली. महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे रिजीजू म्हणाले.

सदस्यांना शपथ घेण्याच्या कामी हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी घटनेच्या कलम 99 अन्वये सुरेश कोडीकुन्नील, थालिकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Web Title: BJP's Bhartruhari Mahtab as Lok Sabha protem speaker; appointed by President Droupadi Murmu 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.