भाजपाचे आता ‘बेटा बचाव’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:10 IST2017-10-11T04:09:26+5:302017-10-11T04:10:08+5:30

सरकार ‘बेटी बचाव’कडून ‘बेटा बचाव’कडे आले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

 BJP's 'beta rescue', Rahul Gandhi's attack on Modi government | भाजपाचे आता ‘बेटा बचाव’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

भाजपाचे आता ‘बेटा बचाव’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : सरकार ‘बेटी बचाव’कडून ‘बेटा बचाव’कडे आले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
अमित शहा यांचा मुलगा जय यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल मोदी सरकारच्या काळात वाढल्याच्या आरोपानंतर अनेक केंद्रीय मंत्री सध्या जय शहा व अमित शहा यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी ‘बेटा बचाव’ असा केला.
अन्य पक्षांनीही केले लक्ष्य
जय शहा यांच्या कंपनीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राजकारण तापले आहे. ‘मोदीजी, आपण पहारेदार म्हणून काम केले की आपण भागीदार होता?’ याचे स्पष्टीकरण द्यावे, असा आग्रहही राहुल गांधी यांनी पुन्हा धरला आहे. या मुद्द्यावरून अन्य विरोधी पक्षांनीही जय शहा यांना लक्ष्य केले आहे. या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी बोलावे,
अशी मागणी विरोधी पक्ष करीत आहेत.
बोचरे टिष्ट्वट
राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या मुलाचा उल्लेख ‘शहा जादा’ असा करत द्विट केले आहे की, ‘बेटी बचाव’कडून ‘बेटा बचाव’कडे झालेले परिवर्तन आश्चर्यकारक आहे. ‘जय शहाच्या व्यवसायाबाबत पीयूष गोयल यांच्याकडून दुसºया दिवशी झालेला बचाव’ या शीर्षकाने त्यांनी एक रिपोर्टही टॅग केला आहे.

Web Title:  BJP's 'beta rescue', Rahul Gandhi's attack on Modi government