शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

भाजपाचे 16 आमदार फुटणार, आमच्या संपर्कात; सोरेन सरकारच्या दाव्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 21:19 IST

भाजपाने गेल्या काही काळात विरोधी पक्षांचे आमदार फोडले आहेत. परंतू भाजपाचा एकही आमदार फुटला नव्हता.

महाराष्ट्र मुकाबला करू शकला नाही, पण इथं बंगालची शेरनी बसलीय याद राखा, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला असतानाच झारखंडमधून मोठी बातमी येत आहे. झारखंडमध्ये सत्ताधारी असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानेभाजपाचे १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 

जेएमएमचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी हे भाजपाचे आमदार लवकरच हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील असे म्हटले आहे. यामुळे झारखंडच्याच नाही तर दिल्लीच्या राजकारणात देखील खळबळ उडाली आहे. 

भाजपाने गेल्या काही काळात विरोधी पक्षांचे आमदार फोडले आहेत. परंतू भाजपाचा एकही आमदार फुटला नव्हता. केंद्रात सत्तेत असल्याने तसेच भाजपाची लाट असल्याने भाजपा सोडून जाणारे तसे फार कमी आहेत. उलट भाजपातच अन्य पक्षांतून इनकमिंग सुरु आहे. असे असताना झामुमोने भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्याने दिल्ली सतर्क झाली आहे. 

या 16 भाजप आमदारांना तेथे घुसमटल्यासारखे वाटत आहे, म्हणून ते जेएमएमला पाठिंबा देऊ इच्छित आहेत. हे आमदार झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारला वेगळा गट स्थापन करून पाठिंबा देऊ शकतात. जेव्हा ते औपचारिक प्रस्ताव पाठवतील तेव्हाच झामुमो या प्रस्तावावर विचार करेल, असेही भट्टाचार्य यांनी सांगितले आहे. हेमंत सोरेन यांच्या सरकारला काही धोका तर नाहीय ना, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. यावर त्यांनी हा दावा केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही त्यांना विचारण्यात आले होते. 

टॅग्स :BJPभाजपाJharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चा