शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

मोदींची जादू ओसरल्याने भाजपा चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 7:40 AM

४ वर्षात २४ पैकी भाजपाने गमावली १२ राज्ये

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादूच्या बळावर विधानसभा निवडणुकीत भाजपा एकापाठोपाठ राज्ये काबीज करण्यात यशस्वी ठरली असली तरी नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादुई प्रभावाला ओहोटी लागल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे भाजपा चिंतित आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपाचे रणनीतीकार मात्र मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांच्या अपराजितपणाचा प्रचार करीत असावेत.

२०१८ मध्ये मात्र मोदींच्या जादूला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. गेल्या चार वर्षांत २४ राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला काँग्रेस-मित्र पक्षांच्या ताब्यातील १२ राज्ये कब्जात घेता आली. विशेष म्हणजे त्रिपुरातील माणिक सरकार यांच्या माकपा सरकारचा पराभव करण्यात भाजप यशस्वी ठरली. २०१७ मध्ये मात्र भाजपाला गोवा जिंकता आले नाही. गोव्यात भाजपविरोधी जनमत असल्याने भाजपला गोव्यात ४० पैकी फक्त १३ जागां जिंकता आल्या. स्पष्ट बहुमत नसताना भाजपाने गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले. दिल्ली आणि बिहारमधील पराभव चुकांची परिणिती असल्याचे भाजपने म्हटले होते; परंतु २०१८ मध्ये भाजपाला जबर हादरा बसला. कर्नाटकात सरकारविरोधी जनमत असतानाही भाजपाला या राज्यात सत्ता मिळविता आली नाही.भाजपाला २०१४ ते २०१७ या चार वर्षांत १२ राज्ये जिंकता आली असली, तरी तेवढीच बारा राज्ये काबीज करता आली नाहीत. उत्तर प्रदेशात ३२५ जागा मिळालेल्या मोठ्या प्रमाणावरील जनादेशाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, राजस्थान, छत्तीसगढ व मध्यप्रदेशात नेतृत्वबदलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे जे घडले ते समोर आहे.२०१७ मध्ये भाजपाने काँग्रेसकडून हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ही राज्ये घेतली, तसेच सपा-बसपाकडून उत्तर प्रदेश घेतले व गुजरात कायम ठेवले; परंतु २०१८ मध्ये भाजपला सूर सापडला नाही व त्रिपुराशिवाय इतर राज्य जिंकता आले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहElectionनिवडणूक