रात्री गर्लफ्रेन्डला भेटायला घरी गेला;जोरदार वादानंतर भाजप नेत्याच्या मुलावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:05 IST2025-09-13T14:57:46+5:302025-09-13T15:05:27+5:30
मध्य प्रदेशात प्रेयसीला भेटायला गेलेल्या भाजपच्या महिला नेत्याच्या मुलावर गोळीबार करण्यात आला.

रात्री गर्लफ्रेन्डला भेटायला घरी गेला;जोरदार वादानंतर भाजप नेत्याच्या मुलावर गोळीबार
MP Crime:मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्याच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीला भेटायला गेला असताना हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. गोळी हाताला चाटून गेल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. या संशयास्पद गोळीबाराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
इंदौरच्या खजराना परिसरात रात्री उशिरा भाजपच्या महिल्या नेत्याच्या मुलावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात जखमी झालेल्या ३१ वर्षीय तरुण अर्जुन जोशीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्जुनची आई ममता नारायण जोशी यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अर्जुन जोशी खजराना पोलीस स्टेशन परिसरातील त्याच्या प्रेयसीला घरी भेटण्यासाठी गेला होता. तिथे त्याच्या आणि प्रेयसीच्या वडिलांमध्ये काही कारणावरून झालेल्या वादानंतर गोळीबार झाला.
जखमी अर्जुनने आरोप केला की त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी त्याच्यावर हल्ला केला आणि गोळीबार केला. प्राथमिक तपासात पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. प्रेमप्रकरणातून दोन्ही पक्षांमध्ये भांडण झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अर्जुन जोशीने प्रेयसीच्या घरातही घुसून तोडफोड केली आणि प्रेयसीला आणि तिच्या वडिलांना मारहाण केली. त्यामुळे प्रेयसीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन जोशी शुक्रवारी मध्यरात्री त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. आधी त्याने भांडण केले आणि त्याच्या प्रेयसीला धमकावले, नंतर मुलीच्या वडिलांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर घरात प्रचंड तोडफोड आणि मारहाण झाली. गोंधळ इतका वाढला की अचानक गोळीबार झाला आणि अर्जुन जखमी झाला. अर्जुनने त्याच्या प्रेयसीच्या वडिलांवर गोळीबार केल्याचा आरोप केला. मात्र गोळी कशी लागली याचा तपास अजूनही सुरू आहे.