शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार, मेघालयमध्ये एनपीपीसोबत युती होणार?, जाणून घ्या महत्वाचे अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 21:37 IST

त्रिपुरामध्ये भाजप पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, तर नागालँडमध्ये एनपीपीसोबत आघाडी करून पुन्हा सत्तेत येऊ शकते.

नवी दिल्ली : ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये 2023 च्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत येथे आलेल्या निकालानुसार त्रिपुरा आणि नागालँडमधील सरकारचे चित्र स्पष्ट होत आहे. त्रिपुरामध्ये भाजप पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, तर नागालँडमध्ये एनपीपीसोबत आघाडी करून पुन्हा सत्तेत येऊ शकते. तर मेघालयात सध्या त्रिशंकू सरकारची स्थिती निर्माण होत आहे.

निवडणूक निकालांसह काही महत्वाचे अपडेट्स जाणून घ्या...

- मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती आहे, म्हणजेच कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत मिळालेले नाही. अशा परिस्थितीत मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा मागितला आहे.

- निकालाचा कल समोर येताच मेघालयातील सरकार स्थापनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी मेघालय भाजप युनिटला सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मेघालयमधील नवीन सरकारसाठी एनपीपीला पाठिंबा देण्याचे बोलले आहे.

- मेघालयमध्ये मुख्यमंत्री कॉनराड संगमा वेस्ट गोरा हिल्समधील दक्षिण तुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तर नागालँडमध्ये नेफ्यू रिओ कोहिमामधील उत्तर अंगामी जागेवरून विजयी झाले आहेत.

- मेघालय भाजपचे अध्यक्ष अर्नेस्ट मौरी यांनी मेघालयमध्ये भाजप दुहेरी आकडा पार करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. हे प्रथमच घडत आहे. येथे भाजपला बहुमत मिळू शकले नाही, पण सरकार स्थापन करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

- त्रिपुरामध्ये भाजपने आतापर्यंत 18 जागा जिंकल्या असून, 15 जागांवर आघाडीवर आहे. सीपीआयएम 2 जागा जिंकून 9 जागांवर तर काँग्रेस 3 जागांवर पुढे आहे. टिपरा मोथा पार्टी 8 जागांवर विजयी झाली असून 4  जागांवर आघाडीवर आहे.

- त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा टाउन बारडोवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्रिपुरामध्ये ते राज्याचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. त्यांचा चेहऱ्यावर भाजपने ही निवडणूक लढवली होती.

- त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आणि दोन्ही राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. स्थिरता आणि प्रगतीसाठी हे मतदान आहे. भाजप भविष्यातही काम करत राहील. दोन्ही राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचेही आभार, त्यांनी परिश्रम घेतले. त्यांचा आम्हाला अभिमान आहे,  असे ते म्हणाले. 

- नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. अजून लोकांच्या विजयाची वाट पाहत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. सर्वजण एनडीएला पाठिंबा देतील.

- एनडीपीपीच्या उमेदवार हेकानी जखालू या नागालँड विधानसभेवर निवडून येत पहिल्या महिला बनून इतिहास रचला. नागालँडच्या हेकानी जखालू यांनी दिमापूर-3 मतदार संघातून विजय मिळवला आहे. त्या नागालँडच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. 1963 मध्ये या राज्याची निर्मिती झाली, मात्र आजपर्यंत एकही महिला प्रतिनिधी येथून निवडणूक जिंकू शकली नाही.

टॅग्स :BJPभाजपाTripuraत्रिपुराElectionनिवडणूक