शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच भाजप बुडणार - नवज्योतसिंग सिद्धू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 05:42 IST

गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले.

 नवी दिल्ली : गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले.पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी मोदी यांनी आश्वासने पूर्ण कशी केली नाहीत, याची उदाहरणेच दिली. ते म्हणाले की, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणलेली नमामी गंगे योजना २0१९ पर्यंत संपेल, असे सांगितले होते. त्यासाठी २0 हजार कोटींची तरतूद केली. त्यापैकी केवळ ६ हजार कोटी रुपयेच खर्च केले. योजनेतील ट्रीटमेंट प्लांटचे काम १0 टक्केच पूर्ण झाले असून, वाराणसीत गंगा आजही सर्वाधिक प्रदूषित आहे.जालियनवाला बाग हत्याकांड ट्रस्टचे अध्यक्ष स्वत: मोदी आहेत. पण पाच वर्षांत त्यांनी ट्रस्टची एकही बैठक घेतली नाही वा ट्रस्टवर एकाचीही नेमणूक केली नाही. ट्रस्टमार्फत कामे करण्यासाठी ४0 कोटींची घोषणाही केली. पण तो निधी दिलाच नाही, अशी टीका त्यांनी केली. अडीच लाख गावांमध्ये फेब्रुवारी २0१९ पर्यंत डिजिटल इंडिया योजनेद्वारे इंटरनेट कनेक्टिविटी पोहोचवू, असा दावा केला. पण अद्याप १ लाख १ गावांमध्येच इंटरनेट पोहचले आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून २0२0 पर्यंत ४0 कोटी लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला होता. पण आतापर्यंत ४१ लोकांनाच प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून रोजगार मिळालेल्यांची संख्या ६ लाखच आहे, असे ते म्हणाले.स्मृती इराणी या तर रडणारे बाळअमेठीमध्ये काँग्रेसतर्फे बुथ कॅप्चरिंग सुरू असल्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या आरोपाचा समाचार घेताना सिद्धू म्हणाले की, इराणी या तर सतत रडणारे बाळ आहेत. त्या सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकलेल्या नाहीत. दिल्लीत त्या पराभूत झाल्या, अमेठीमध्येही त्यांचा पराभव झाला. आताही त्यांचा पराभव अटळ आहे. त्यामुळेच त्या असले आरोप करीत आहेत.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक