माकपला जमले नाही ते भाजप १० वर्षांत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:44 IST2024-12-23T06:44:39+5:302024-12-23T06:44:47+5:30
डाव्या आघाडीचे सरकार असताना त्रिपुरा राज्य ३५ वर्षे मागे राहिले

माकपला जमले नाही ते भाजप १० वर्षांत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा
आगरतळा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकपा) जे ३० वर्षांत जमले नाही ते भाजप त्रिपुरा राज्यात दहा वर्षांत करून दाखवणार, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. २०२८ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मी भाजप व माकप या दोन्ही सरकारचे 'रिपोर्ट कार्ड' सादर करणार आहे. तोपर्यंत भाजपची कामगिरी मागील डाव्या सरकारच्या कामगिरीपेक्षा सरस असेल, असा विश्वास आगरतळा येथील राष्ट्रीय सहकार सम्मेलनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी व्यक्त केला. डाव्या आघाडीचे सरकार असताना त्रिपुरा राज्य ३५ वर्षे मागे राहिले, कारण त्या सरकारने केवळ माकपच्या कार्यकर्त्यांसाठी काम केले. त्रिपुराने भाजपला दोन वेळा जनादेश दिला आहे. तिसऱ्यावेळी २०२८ मध्ये मी भाजपने दहा वर्षांत केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड घेऊन येईल. त्याची तुलना माकपच्या ३९ वर्षांच्या कार्यकाळासोबत करील, मला याची खात्री आहे, भाजपचे रिपोर्ट कार्ड माकपपेक्षा चांगले असेल असे ते म्हणाले. मिझोरामधील विस्थापित झालेल्या ब्रू आदिवासींच्या पुनर्वसनाचा उल्लेख करत ते त्रिपुरात स्थायिक झाल्याबद्दल गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.