शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, केजरीवालांना या गोष्टीने बुडविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:16 IST

BJP vs AAP Delhi Election Results 2025 News: काही दिवसांपूर्वीच हजारेंनी केजरीवालांना स्वार्थी म्हटले होते.  अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता.

गेल्या दोन विधानसभा एकहाती सत्ता मिळविणाऱ्या आपला चौथ्या निवडणुकीत दिल्लीकरांनी खाली खेचले आहे. अद्याप निकाल हाती आलेले नसले तरी भाजपा ४५, आप २५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा तर सुफडा साफ झाला आहे. वेगवेगळे लढण्याची खुमखुमी काँग्रेस आणि आपला नडली असली तरी केजरीवालांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारे (Anna Hazare) यांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे. 

दिल्ली निकालावर (Delhi Election Results) अण्णा हजारे यांनी केजरीवालांना दारू घोटाळ्याने बुडविले, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच हजारेंनी केजरीवालांना स्वार्थी म्हटले होते.  अरविंद केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पार्टीच्या नादात अरविंद केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता. तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे हजारे म्हणाले होते. 

आजच्या आपच्या दिल्ली पराभवावर हजारेंनी म्हटले की, मी बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे की निवडणूक लढवताना उमेदवाराचे चारित्र्य, चांगले विचार आणि प्रतिमेवर कोणताही डाग नसावा. पण, त्यांना (आप) ते समजले नाही. ते दारू आणि पैशात अडकले, त्यामुळे त्यांची (अरविंद केजरीवाल) प्रतिमा खराब झाली आणि म्हणूनच त्यांना निवडणुकीत कमी मते मिळत आहेत, असे मत हजारे यांनी व्यक्त केले. 

तसेच लोकांनी पाहिले की केजरीवाल चारित्र्याबद्दल बोलतात पण दारूमध्ये वाहत गेले. कारण त्यात पैसा आला. राजकारणात आरोप केले जातात. पण दोषी नाही हे सिद्ध करावे लागते. सत्य सत्यच राहील. जेव्हा पहिली बैठक झाली तेव्हा मी ठरवले की मी पक्षाचा भाग राहणार नाही आणि मी त्या दिवसापासून दूर राहिलो, असे हजारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपanna hazareअण्णा हजारेBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूक