शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी पंतप्रधान आहेत तोवर बिनधास्त...’, राहुल गांधींच्या ट्विटवरून भाजप नेत्यानं साधला जोरदार निशाणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 1, 2021 16:08 IST

सोशल मीडिया यूझर्स तर, ही वर्षातली पहिली राजकीय लढाई असल्याचे म्हणत आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडिया यूझर्स तर, ही वर्षातली पहिली राजकीय लढाई असल्याचे म्हणत आहेत.सध्या राहुल गांधी इटलीमध्ये आहेत.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इटलीतून जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ला - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्विटरवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया यूझर्स तर, ही वर्षातली पहिली राजकीय लढाई असल्याचे म्हणत आहेत. सध्या राहुल गांधी इटलीमध्ये आहेत. त्यांच्या या टूरवरूनच गिरिराज सिंहांनी व्यगात्मक निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इटलीतून जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले आहे, "नवे वर्ष सुरू होताना, ज्यांना आपण गमावले आहे त्यांची आठवण काढत आहोत. तसेच ज्यांनी आपले संरक्षण केले आणि बलिदान दिले त्या सर्वांचे आभार मानत आहोत. मी मान आणि सन्मानाने अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा”. 

यानंतर, भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींचे हे ट्विट रिट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरिराज सिंह ट्विट करत म्हणाले, “जोवर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, तोवर आपण बिनधास्त फिरू शकता आणि एन्जॉय करू शकता. पार्टी हार्ड”.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या ट्विटवर गिरिराज सिंहांची अशी प्रतिक्रिया पाहून, सोशल मीडिया यूझर्स कमेंट करत आहेत. अनेक लोकांनी, गिरिराज सिंहांच्या प्रतिक्रियेची तारिफ करत म्हणटले आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशीतर सोडून द्या. तर अनेक युझर्स गिरिराज सिंहांना ट्रोलदेखील करत आहेत.

...तर देशातील ११ कोटी कुटुंबांना २० हजार रुपये मिळाले असते -तत्पूर्वी, मोदी सरकारने या वर्षी 2378760000000 इतके कर्ज काही उद्योगपतींचे माफ केले आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत याच पैशांचा वापर करून देशातील ११ कोटी कुटुंबांना २०-२० हजार रुपये देता आले असते. मोदीजींच्या विकासाचा हाच खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती. 

पंतप्रधान मोदींसंदर्भात राहुल गांधींचा 'ट्विटर पोल' - यापूर्वी आणखी एक ट्विट करत राहुल गांधी यांनी, मोदिंविरोधात एक ट्विटर पोल सुरू केला आहे. यासाठी त्यांनी चार पर्यायही दिले आहेत. यात, पहिला पर्याय - पीएम मोदी शेतकरी विरोधी आहेत, दुसरा पर्याय - पीएम मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहेत, तिसरा पर्याय - ते हट्टी आहेत, तर चौथा पर्याय - यांपैकी सर्व, असा आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा