शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञातवासात असलेल्या नूपूर शर्मा यांना भाजपा रायबरेलीतून देणार उमेदवारी, पुढच्या यादीतून होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 19:57 IST

Nupur Sharma News: भाजपाकडून उत्तर प्रदेशातील उर्वरित २४ जागांवर उमेदवार देताना अनेक धक्कादायक नावं समोर आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नूपूर शर्मा यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी भाजपानेउत्तर प्रदेशमधील ५१ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. तर २४ जागांवर भाजपाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. उर्वरित ५ जागा ह्या मित्रपक्षांना मिळणार आहे. त्यामध्ये २ आरएलडी, २ आपना दल आणि १ एसबीएसपीला देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाकडून उर्वरित २४ जागांवर उमेदवार देताना अनेक धक्कादायक नावं समोर आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नूपूर शर्मा यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. नूपूर शर्मा यांना भाजपा रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असा दावा केला जात आहे.  

उत्तर प्रदेशमधील राजकारणाबाबत समोर येत असलेल्या वृत्तानुसार भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या यादीत काही आश्चर्यकारक नावांचा समावेश केला जाऊ शकतो. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीही पक्षाकडून नावांची घोषणा होऊ शकते. सोमवारी रात्री दिल्लीमध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्यात उत्तर प्रदेशमधील उर्वरित जागांसाठी उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली होती. दरम्यान, रायबरेली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तसेच नूपूर शर्मा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. रायबरेली हा काँग्रेस पक्ष २००४ पासून अजेय असलेला एकमेव मतदारसंघ आहे. येथून सोनिया गांधी ह्या सातत्याने निवडून येत आहेत. मात्र यावेळी सोनिया गांधी रायबरेली येथून निवडणूक लढवणार नाहीत. सोनिया गांधी ह्या राज्यसभेवर निवडून गेल्याने रायबरेली येथून प्रियंका गांधी किंवा नूपूर शर्मा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

रायबरेली येथून भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असलेल्या नूपूर शर्मा ह्या विद्यार्थीदशेत एबीव्हीपीमध्ये सक्रीय होत्या. २००८ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. पेशाने वकील असलेल्या नूपूर शर्मा यांनी २०१५ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, २ वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यांना धमक्याही मिळाल्या होत्या. तसेच त्यांच्या या विधानाची प्रतिक्रिया म्हणून अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ झाली होती. मात्र आता त्यांचं राजकारणात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशrae-bareli-pcरायबरेली