भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:03 IST2025-11-10T15:56:19+5:302025-11-10T16:03:04+5:30
BJP sweeps UT Election 2025: या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी आधीच भाजपाने अनेक जागा बिनविरोध पटकावल्या होत्या. जिथे निवडणुका झाल्या, तिथेही भाजपाने आपले वर्चस्व कायम राखत काँग्रेसला चितपट केले.

भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
BJP sweeps UT Election 2025: एकीकडे देशभरात बिहारमधील विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा सुरू असताना, दुसरीकडे मात्र केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने १२२ पैकी १०७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे. देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र २ जागांवर समाधान मानावे लागले असून, पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
५ नोव्हेंबर रोजी दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने अनपेक्षित कामगिरी केली, १२२ पैकी १०७ जागा जिंकल्या. काँग्रेस फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला. भाजपाने दमण जिल्हा पंचायतीच्या १६ पैकी १० जागा आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. दमण नगरपरिषदेच्या १५ पैकी १२ जागा भाजपाने बिनविरोध जिंकल्या. उर्वरित तीन जागांपैकी दोन जागा भाजपाला आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली.
नगर परिषदेतील सर्व १५ जागा भाजपने जिंकल्या
दादरा नगर हवेली जिल्हा पंचायतीच्या २६ पैकी १७ जागा भाजपाने बिनविरोध जिंकल्या. उर्वरित नऊ जागांसाठी मतदान झाले, त्यात ७ जागा भाजपाला मिळाल्या, तर दोन जागा काँग्रेस उमेदवार विजयी झाले. दीव जिल्हा पंचायतीच्या ८ जागांपैकी ५ जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या. उर्वरित जागा मतदानानंतर जिंकल्या. दमण नगर परिषदेत पक्षाने अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. १५ पैकी १४ जागा जिंकल्या. दमण ग्रामपंचायतीत, भाजपाने १६ पैकी १५ जागा जिंकल्या. तर, सिल्व्हासा नगर परिषदेतील सर्व १५ जागा भाजपाने जिंकल्या. शिवाय, २६ पैकी १६ ग्रामपंचायत जागांवर भाजपा उमेदवारांनी विजय मिळवला. उर्वरित जागा काँग्रेस समर्थित उमेदवार आणि अपक्षांना मिळाल्या.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी निवडणुकीतील विजयाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रशासित प्रदेशातील सरपंच, जिल्हा पंचायत आणि नगरसेवक निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व पाठिंबा दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथील माझ्या बंधू आणि भगिनींचे आभार मानतो. हे आमच्या पक्षाच्या विकासाच्या अजेंड्याशी केंद्रशासित प्रदेशाचे मजबूत संबंध दर्शवते. मी तळागाळातील आमच्या मेहनती कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.