शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनंतकुमार हेगडेंवर पक्षश्रेष्ठी नाराज, 40 हजार कोटींच्या वक्तव्यावरुन 'समज' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 08:59 IST

अनंत कुमार हेगडेंच्या विधानामुळे महाराष्ट्रात आणि राजधानी दिल्लीतही खळबळ उडाली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 40 हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरउपयोग होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अल्पकाळासाठी का होईना, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले, त्यांनी तो निधी पुन्हा केंद्राकडे पाठविला, असे विधान भाजपचे कर्नाटकातील नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी केल्याने भाजपाच्या गटात नाराजीचा सूर उमटला आहे. हेगडे यांच्या विधानामुळे दिल्लीतील भाजपा नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

अनंत कुमार हेगडेंच्या विधानामुळे महाराष्ट्रात आणि राजधानी दिल्लीतही खळबळ उडाली. त्यामुळे असा कोणताही निधी आपण मुख्यमंत्री वा काळजीवाहू मुख्यमंत्री असताना केंद्राकडे पाठविला नाही, असा खुलासा लगेचच देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला. मात्र, स्वत: हेगडेंनी अद्यापही त्यावर काहीच स्पष्टीकरण दिले नाही. पण, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फडणवीसांना लक्ष्य केलं जातंय. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी याप्रकरणावरुन मोदींचा राजीनामा मागितलाय, तर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी, भाजपाला लक्ष्य करताना, भाजपाने महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचा आरोप केलाय. दिल्लीतील वरिष्ठ भाजपा नेत्यांकडून अनंतकुमार हेगडेंना समज देण्यात येणार असल्याची माहिती आहे. हेगडेंच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असले तरी, दिल्ली दरबारीही त्याचा सूर पोहोचला आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागल्याने दिल्लीतील नेत्यांमध्ये पहिलीच नाराजी असून, हेगडेंच्या या स्टेटमेंटमुळे सत्ताधाऱ्यांनी आयतं कोलित मिळालंय. त्यामुळे दिल्लीकर नेतेही हेगडेंच्या स्टेटमेंटमुळे त्यांच्यावर नाराज आहेत. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय.  

फडणवीस म्हणाले की, बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून आलेला कुठलाही निधी राज्य सरकारने परत पाठविलेला नाही. असा निधी परत पाठविण्याचा अधिकारच राज्याला नाही. त्यामुळे पैसे परत पाठविण्याचा प्रश्नच येत नाही. अनंतकुमार हेगडे काय बोलले, हे मला माहीत नाही, परंतु केंद्राकडून आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत पाठविण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो नव्हतो. बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्यात महाराष्ट्र सरकार केवळ भूसंपादनाचे काम करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याला सरकारची आर्थिक निर्णयप्रक्रिया समजते, त्याला ही गोष्ट समजू शकते. या प्रकरणी राज्य सरकारच्या अर्थ विभागाने सत्य समोर आणावे.

टॅग्स :Anantkumar Hegdeअनंतकुमार हेगडेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस