शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

मोदी सरकारच्या मोटार वाहन कायद्याला 5 भाजपाशासित राज्यांकडून ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 09:51 IST

दंडाची रक्कम जास्त असल्यानं राज्य सरकारांना

नवी दिल्ली: एक देश एक कर म्हणत जीएसटी लागू करणाऱ्या, एक देश एक प्रधान म्हणत जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवणाऱ्या मोदी सरकारला एक देश एक कायदा राबवताना मात्र अपयश असल्याचं चित्र दिसत आहे. मोटार वाहन कायदा सुधारणा लागू होऊन अवघे 11 दिवस झाले आहेत. मात्र भरभक्कम दंडाची तरतूद असणाऱ्या या नव्या कायद्याला भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांनीच ब्रेक लावला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहन कायद्यात सुधारणा लागू केली. सरकारी तिजोरी भरण्यासाठी नव्हे, तर लोकांचा जीव वाचवा यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याचं गडकरी म्हणाले. मात्र भाजपाची सत्ता असलेल्या अनेक राज्यांनी नव्या कायद्याची अंमलबजावणी थांबवली आहे. यातील काही राज्यांमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे.गुजरात- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या गुजरातनं सर्वात आधी नव्या कायद्याची अंमलबजावणी थांबवली. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अनेक दंडांची रक्कम थेट 90 टक्क्यांनी खाली आणली. महाराष्ट्र- राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळेच मतदारांचा रोष टाळण्यासाठी सरकारनं नव्या कायद्याला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्रदेखील लिहिलं आहे. उत्तराखंड- नव्या मोटार कायद्यातील दंडाची रक्कम जास्त असल्याचं मत मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम राज्य सरकारकडून निम्म्यावर आणण्यात आली आहे.झारखंड- महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्येही निवडणूक होणार आहे. त्यामुळेच नवा कायदा लागू करण्यात आलेला नाही. कायदा लागू झाला, तरी त्यातील दंडाची रक्कम कमी असेल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हरयाणा- वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नवा कायदा लागू करण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी राज्यात 45 दिवस जागरुकता अभियान सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.   

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्रJharkhandझारखंडChhattisgarhछत्तीसगड