शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपाच्या सहाव्या यादीत 13 पाटीदार उमेदवार, आनंदीबेन पटेल यांना नाही मिळालं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:51 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सुरू असलेल्या प्रचंड गोंधळामध्येच भाजपानं आपली सहावी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सुरू असलेल्या प्रचंड गोंधळामध्येच भाजपानं आपली सहावी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच भाजपानं गुजरात विधानसभेसाठीच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान, या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या नावाचा समावेश नाहीय, त्यांच्याऐवजी भूपेंद्र पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. कारण, आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक लढवण्यास पूर्वीच नकार दिला होता. 

भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचे सुरू झालेले प्रकरण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत सुरू आहे. काँग्रेस पक्षालाही या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. 9 डिंसेबर आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.  

फोनवरुन अर्ज भरण्याचे निर्देशयापूर्वी अशी माहिती समोर आली की, भाजपा पक्षात बंडखोरी मोठ्या प्रमाणात उफाळून आल्यानंच शेवटच्या दिवसापर्यंत सर्व उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. शिवाय, उमेदवारांना फोनवरुनच अर्ज भरण्यास सांगण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती, जेणेकरुन तिकीट रद्द झाल्यानंतर आपल्याच नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागू नये. दरम्यान, भाजपानं सुरुवातीला 5 याद्या जाहीर करत 148 उमेदवारांची नावं जाहीर केली होती. यामध्ये भाजपानं चार पाटीदारांनाही उमेदवारी दिली आहे, ज्यात नरणभाई पटेल, रमणभाई पटेल, वल्लभ ककडिया आणि पंकज देसाई यांचा समावेश आहे. 

मागच्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाने गुजरातची लढाई प्रतिष्ठेची केली आहे.  मोदींच्या काळात भाजपाने इथे आपली पाळंमुळं अधिक  घट्टपणे रोवली. पण मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय उलथापालथी घडल्या. 

मोदी यांच्यानंतर आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण नंतर त्यांना हटवून त्यांच्या जागी विजय रुपानी यांना आणण्यात आले. याच दरम्यान गुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे राहिले. गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचारही झाला. पटेल आरक्षण महत्वाचा मुद्दा बनला. गुजरातमध्ये पटेल समाजाने नेहमीच भाजपाला साथ दिली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत पटेलांना सोबत ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस