बिहार निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली; तारापूरमधून सम्राट चौधरी निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:58 IST2025-10-14T14:46:03+5:302025-10-14T14:58:04+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ७१ उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने तारापूर येथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

बिहार निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली; तारापूरमधून सम्राट चौधरी निवडणूक लढवणार
बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ७१ उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना तारापूर येथून तिकीट दिले आहे.
चौधरींव्यतिरिक्त, भाजपच्या पहिल्या यादीत रामकृपाल यादव, संजीव चौरसिया, विजय सिन्हा, श्रेयसी सिंह आणि मंगल पांडे यांची प्रमुख नावे आहेत. पक्षाच्या पहिल्या यादीत नऊ महिलांचाही समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष नंद किशोर यांना तिकीट देण्यात आलेले नाही.
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा बिहार विधानसभा चुनाव-2025 के लिए चयनित सभी प्रत्याशियों को हार्दिक बधाई एवं विजयश्री की अग्रिम शुभकामनाएं।#आएगी_NDApic.twitter.com/vENiqKpx1w
— BJP Bihar (@BJP4Bihar) October 14, 2025
रत्नेश कुशवाह यांना पाटणा साहिब, रमा निषाद यांना औराई, राजकुमार यांना साहिबगंज येथून उमेदवारी देण्यात आली आहे. फोर्ब्सगंज येथून विद्यासागर, किशनगंज येथून स्वीटी सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरौंडा येथून कर्णजित सिंह, लालगंज येथून संजय कुमार सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सम्राट चौधरी यांना ज्या जागेवरून तिकीट देण्यात आले त्या जागेबाबत अडचणी होत्या. मुख्यमंत्री नितीश कुमार हे जागा वाटपावर नाराज असल्याचे सांगण्यात आले. सम्राट चौधरी यांनी तारापूर येथून निवडणूक लढवू नये असे त्यांना वाटत होते. त्यांच्या उमेदवारीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.