Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result: निकालापूर्वीच भाजप तयार! त्रिपुरा व मेघालयात रंगू शकते सत्तानाट्य; नेत्यांना पाठविले मोहिमेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:05 AM2023-03-02T06:05:26+5:302023-03-02T06:06:16+5:30

Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result:

BJP ready before the result! Power drama can take place in Tripura and Meghalaya; Leaders sent on missions | Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result: निकालापूर्वीच भाजप तयार! त्रिपुरा व मेघालयात रंगू शकते सत्तानाट्य; नेत्यांना पाठविले मोहिमेवर

Tripura, Nagaland, Meghalaya's Election Result: निकालापूर्वीच भाजप तयार! त्रिपुरा व मेघालयात रंगू शकते सत्तानाट्य; नेत्यांना पाठविले मोहिमेवर

googlenewsNext

- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड व मेघालय या तीन राज्यांत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. त्यातील त्रिपुरा व मेघालयात तोडफोडीची शक्यता दिसते. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, माजी मुख्यमंत्री विप्लव देव, ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक संबित पात्रा यांच्यासह सहा नेत्यांना निवडणूक निकालापूर्वी तीन राज्यांत तैनात केले आहे.

तिन्ही राज्यांतील निवडणूक निकालांपूर्वीच दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी केली जात आहे. उद्या होळी खेळली जाणार आहे, असे म्हटले जात आहे कारण भाजप दोन राज्यांत पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. निवडणूक निकालांपूर्वीच एक्झिट पोलने
 त्रिपुरा व नागालँडमध्ये भाजप स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. तर मेघालयात त्रिशंकू सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्रिपुरात भाजपचे सरकार आल्यास तेथे प्रथमच महिला मुख्यमंत्री होऊ शकते. प्रतिमा भौमिक यांना निवडणूक लढविण्यासाठी पाठवले, तेव्हाच याबाबतची शक्यता व्यक्त केली जात होती. 

आसाम  
भाजपसाठी तोडफोड करण्यातील अग्रणी हेमंत बिस्वा सरमा यांनी पूर्ण तयारीनिशी अगरतळामध्ये ठाण मांडले आहे. भाजप नेते संबित पात्रा व माजी मुख्यमंत्री विप्लव देव हे त्रिपुरामध्ये यासाठीच गेले आहेत. त्रिपुरामध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने सरकार स्थापन करणे, ही ऐतिहासिक घटना होईल. अशाच प्रकारे नागालँडमध्ये भाजपचे सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन होणे निश्चित मानले जाते. 

मेघालय
त्रिशंकू निकालांची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे भाजपच्या तोडफोडीचा कस लागणार आहे. येथे कशा प्रकारे सरकार स्थापन होऊ शकते किंवा राष्ट्रपती राजवट लावून भाजप मागील दाराने सरकार चालवतो, हे येणारा काळच ठरवेल. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू व भाजप नेते ऋतुराज सिन्हा आधीपासूनच मेघालयात ठाण मांडून आहेत. तृणमूल उमेदवारांवर भाजपची नजर राहील.

त्रिपुरा
एक्झिट पोलबरोबरच भाजपचा अंदाज आहे की, त्रिपुरात भाजप बहुमताच्या ६० पैकी ३० या जादुई आकड्याच्या आसपास असेल. दोन-चार जागा कमी-जास्त मिळू शकतात. बहुमताला जागा कमी पडण्याच्या स्थितीत भाजप त्रिपुरात तीपरा मोथासमवेत युती करू शकतो, तसेच काही अपक्षांना आपलेसे करू शकतो. या सर्व हालचाली निवडणूक निकालानंतरच होऊ शकतात.

निधी जमविण्यात भाजप देशात आघाडीवर
n २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात आठ राष्ट्रीय पक्षांचे ३२८९.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न होते. त्यांतील निम्म्याहून अधिक रक्कम एकट्या भाजपला मिळाली, असे असोसिशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने सांगितले.
n भाजपने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १९१७.१२ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले व त्यातील ८५४.४६७ कोटी रुपये खर्च केले. भाजपनंतर सर्वाधिक ५४५.७४५ कोटी रुपयांची रक्कम तृणमूल काँग्रेसला मिळाली आहे. 
n २०२१-२२मध्ये काँग्रेसचे एकूण उत्पन्न ५४१.२७५ कोटी रुपये होते. त्यातील ७३.९८ टक्के पैसे खर्च करण्यात आले. 

Web Title: BJP ready before the result! Power drama can take place in Tripura and Meghalaya; Leaders sent on missions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.