शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अकबर यांना भाजपाचे ‘संरक्षण’; राजीनामा नाहीच, ‘मीटू’कडेही दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 06:19 IST

निवडणुकांमुळे चुप्पी : काँग्रेसला राफेलनंतर मिळाला आणखी एक आयता मुद्दा

नवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी परेदशातून परतताच लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केल्यानंतर केंद्र सरकार व भाजपाने त्यांना तूर्त तरी संरक्षण देण्याचा आणि मीटू मोहिमेकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे. अकबर यांनी आपली बाजू मांडली असून, त्यांनी संबंधितांवर दावाही दाखल केला आहे, असे स्पष्टपणे सांगतानाच, आता त्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, असेच जणू भाजपा नेत्यांनी सोमवारी सूचित केले.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, अकबर यांची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांना कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. मात्र नड्डा यांनी अकबर यांच्या राजीनाम्याविषयी बोलण्यास नकार दिला. भाजपाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव म्हणाले की, अकबर यांच्यावरील आरोप पक्षाने मान्य वा अमान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता अकबर यांनी स्वत:हूनच आपले म्हणणे मांडले आहे. तेही राजीनाम्याविषयी काहीच बोलले नाहीत.अकबर यांच्या रूपाने मुस्लीम नेत्याला संरक्षण द्यावे आणि त्यांच्या राजीनाम्याविषयी बोलू नये, अशी भूमिका भाजपाने घेतलेली दिसते. एवढेच नव्हे, तर मीटू मोहिमेचे एकदा स्वागत केले असले तरी त्यावर आता फार बोलायचे नाही, असे भाजपाने ठरविले आहे, असे कळते. महिलांच्या सशक्तीकरणाविषयी मात्र भाजपा सतत बोलत राहणार आहे. आमच्या सरकारनेच महिलांचे सशक्तीकरण केले, अशी भाजपाची भूमिका असेल, असे दिसते.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत हा विषय वाढवायचा नाही, अशी भाजपाची भूमिका दिसत आहे. याच विषयावर हल्ला चढवण्याचे ठरवले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्य प्रदेशमधील एका सभेत बलात्काराचे आरोप असलेल्या भाजपाचा उल्लेख करून, भाजपापासून मुलींना वाचवा असा नारा दिला. महिलांचे लैंगिक शोषण, राफेल विमान खरेदी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हे तीन विषय काँग्रेसला मोदी सरकारवर हल्ला चढवायला आयतेच मिळाले आहेत.पण मीटूमुळे राफेलचा विषय मागे पडत चालला आहे आणि मीटूचे समर्थन करताना, १0 वा २0 वर्षांपूर्वीची प्रकरणे आता काढून काय उपयोग, अशी भूमिका भाजपा नेते घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बहुधा मनेका गांधी आणि स्मृती इराणी यांनी आता न बोलण्याचे ठरविले आहे, असे कळले.पत्रकार संघटनांनी मात्र अकबर यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. स्वत:हून राजीनामा न देता, खटला दाखल करून तक्रारदारांचे तोंड बंद करण्याचा पवित्रा घेतल्याबद्दल देशभरातील पत्रकारांच्या संघटनांनी संताप व्यक्त केला. प्रेस क्लब आॅफ इंडिया, इंडियन विमेन प्रेस कॉर्प््स, प्रेस असोसिएशन आणि साऊथ एशियन विमेन इन मीडिया या संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत अकबर यांनी पदावरून दूर व्हावे, अशी मागणी केली आहे.

अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात आज दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला. रमानी यांनी जाणीवपूर्वक आणि चुकीच्या हेतूने शोषणाचे आरोप केल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. याउलट, निर्लेप सत्य हाच माझा बचाव असल्याने अकबर यांनी माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यास सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे ठाम प्रत्युत्तर अकबर प्रिया रमाणी यांनी म्हटले आहे.

आरोप गांभीर्याने घेण्याऐवजी खटला दाखल करून तक्रारदार महिलांची तोंडे धाकदपटशा करून व त्रास देऊन बंद करण्याचा पवित्रा अकबर यांनी स्पष्ट केला आहे, असेही रमाणी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo CampaignमीटूBJPभाजपाcongressकाँग्रेस