शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

'एअर स्ट्राइक'वरून भाजपामध्येच मतमतांतरं; अध्यक्ष-उपाध्यक्षांपैकी कोण खोटं, कोण खरं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 12:47 PM

अमित शहांकडे मृत दहशतवाद्यांचा आकडा; पण सरकार म्हणतं आकडा माहीत नाही

bjp president amit shah and union minister s s ahluwalia makes different claims on air strikeनवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकवरुन जोरदार राजकारण सुरू आहे. हवाई दलाच्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले, याचा आकडा सैन्याकडून जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्याच आठवड्यात हवाई दलाचे  व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र असा आकडा सांगणं योग्य होणार नाही, असं कपूर म्हणाले होते. हवाई दलानं मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा जाहीर केलेला नसला तरी, भाजपानं या हल्ल्यावरुन दावे सुरू केले आहेत. काल रात्री अमित शहा अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 250 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा त्यांनी केला. हवाई दलानं केलेला हल्ला अतिशय यशस्वी ठरला. या हल्ल्यात हवाई दलाचं कोणतंही नुकसान झालं नाही, असंदेखील शहा म्हणाले. भाजपा अध्यक्ष 250 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं विधान करत असताना भाजपाचेच उपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी मात्र वेगळीच माहिती दिली. हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशानं करण्यात आला नव्हता, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. 'भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करू शकतो, हा संदेश देण्यासाठी एअर स्ट्राइक करण्यात आला,' असं अहलुवालिया म्हणाले. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याचा आकडा पंतप्रधान किंवा कोणत्या सरकारी प्रवक्त्यानं दिलेला नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शहा 250 हून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करत असले, तरी त्यांच्याच पक्षाचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले, याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. पंतप्रधान, मंत्री किंवा सरकारच्या प्रवक्त्यानं याबद्दलचा आकडा जाहीर केलेला नाही, असं खुद्द केंद्रीय मंत्री सांगत आहेत. याशिवाय हवाई दलानंदेखील मृत दहशतवाद्यांचा नेमका आकडा जाहीर केलेला नाही. त्यामुळे 250 हून अधिक दहशतवादी मारले गेले, हा आकडा अमित शहांना कुठून मिळाला? भाजपाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांपैकी नेमकं कोण खरं आणि कोण खोटं? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाindian air forceभारतीय हवाई दलJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादी