हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं 68 उमेदवारांची यादी केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 18:39 IST2017-10-18T18:38:31+5:302017-10-18T18:39:07+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं इच्छुकांपैकी 68 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह यांनी या उमेदवारांची यादीची घोषणा केली असून, यादीत मोठ्या नावांचा समावेश आहे.

हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं 68 उमेदवारांची यादी केली जाहीर
हिमाचल प्रदेश- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं इच्छुकांपैकी 68 जणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह यांनी या उमेदवारांची यादीची घोषणा केली असून, यादीत मोठ्या नावांचा समावेश आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्तीच्या ऊनामधून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. अनेक मोठ्या नेत्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत. सध्याचे विद्यमान आमदार रिखी राम कोंडल यांचीही झंडुता मतदारसंघातून नाव वगळण्यात आलं आहे. तसेच सुंदरनगरहून रुप सिंह ठाकूर व कुल्लूमधून बंजारच्या खिमी राम शर्मा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच सहा महिला उमेदवारांनाही भाजपानं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.