राहुल गांधींना घेरण्याची भाजपाची नवी योजना; लोकांना वस्तुस्थिती सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:22 IST2018-04-21T00:22:35+5:302018-04-21T00:22:35+5:30

न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याचे ठरवले आहे. भाजपा खासदारांना तसे निर्देश दिले आहेत.

BJP plans new scheme to cover Rahul Gandhi; Tell the facts to the people | राहुल गांधींना घेरण्याची भाजपाची नवी योजना; लोकांना वस्तुस्थिती सांगा

राहुल गांधींना घेरण्याची भाजपाची नवी योजना; लोकांना वस्तुस्थिती सांगा

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याचे ठरवले आहे. भाजपा खासदारांना तसे निर्देश दिले आहेत.
पक्षाच्या संसदीय दलाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्षाध्यक्ष अमित शहा यांना बदनाम करण्याच्या विरोधात आपल्या भागात राहुल गांधींविरुद्ध मोहीम चालवावी.
पक्षाचे संसदीय सचिव बालसुब्रह्मण्यम यांच्या हस्ताक्षरातील या पत्रात प्रत्येक खासदारांना स्थानिक टीव्ही चॅनलवर यावर बोलण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय अन्य प्रिंट माध्यमातही निवेदन जारी करून राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी करावी, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: BJP plans new scheme to cover Rahul Gandhi; Tell the facts to the people