राहुल गांधी देशद्रोही, खोटं बोलून देशाची बदनामी करतात...भाजपचा नेत्याचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:40 IST2024-12-05T17:39:59+5:302024-12-05T17:40:55+5:30

BJP On Rahul Gandhi: भारताला अस्थिर करणाऱ्या माध्यमांसह आंतरराष्ट्रीय शक्तींशी राहुल गांधींचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

BJP On Rahul Gandhi: Rahul Gandhi is a traitor, defames the country by telling lies...BJP leader's serious accusation | राहुल गांधी देशद्रोही, खोटं बोलून देशाची बदनामी करतात...भाजपचा नेत्याचा गंभीर आरोप

राहुल गांधी देशद्रोही, खोटं बोलून देशाची बदनामी करतात...भाजपचा नेत्याचा गंभीर आरोप

Rahul Gandhi News : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विविध मुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये वाद-विवाद पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा देशविरोधी शक्तींशी संबंध असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. फ्रेंच मीडिया 'मीडियापार्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टचा हवाला देत भाजप खासदार संबित पात्रायांनी दावा केला की, भारताला अस्थिर करणाऱ्या माध्यमांसह आंतरराष्ट्रीय शक्तींशी राहुल गांधींचा संबंध असून, राहुल गांधी देशद्रोही असल्याचा आरोप त्यांनी केला. 

'राहुल गांधी देशद्रोही'
संबित पात्रा म्हणाले, जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसतो, तेव्हा तुम्ही स्वतःचे मुद्दे तयार करून देशाच्या विरोधात असे मुद्दे निर्माण करता आणि जागतिक स्तरावर देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. राहुल गांधी हेच करत आहेत, म्हणूनच मी त्यांना देशद्रोही म्हटले. जे लोक वस्तुस्थितीच्या आधारे नव्हे, तर खोटे बोलून देशाची बदनामी करतात...त्यांना देशद्रोही नाही, तर काय म्हणायचे? राहुल गांधी देशद्रोही आहेत, असे म्हणण्यास मला अजिबात संकोच नाही, अशी टीका पात्रांनी केली.

सोरोस, OCCRP आणि यूएस डीप स्टेट...
अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस आणि काही यूएस-आधारित एजन्सी, 'ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट' आणि राहुल गांधी यांचे त्रिकूट भारताला अस्थिर करण्याचा आणि शासन बदलासाठी लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पात्रा यांनी केला. 'मीडियापार्ट' रिपोर्टचा हवाला देत पात्रा म्हणाले की, 'OCCRP चे अनेक खंडांमध्ये 50 हून अधिक मीडिया पार्टनर आहेत आणि ते त्यांच्या कामासाठी निधी देण्यासाठी जॉर्ज सोरोस आणि अमेरिकेतील भारतविरोधी शक्तींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. जर त्यांना 70 टक्के संसाधने एकाच स्त्रोताकडून मिळत असतील तर ते तटस्थ राहू शकत नाहीत.'

राहुल गांधींनी ओसीसीआरपीच्या अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य करण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली. ब्राझीलने एका खाजगी भारतीय कंपनीद्वारे निर्मित कोविड लस, कोवॅक्सिनसाठी $324 मिल्यनची ऑर्डर रद्द केल्याच्या OCCRP अहवालानंतर गांधींनी जुलै 2021 मध्ये सरकारवर हल्ला केला. हा भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे.  ओसीसीआरपी अहवाल आणि भारतीय बाजारातील शेअर्सच्या किमती कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योगपतींवर हल्ला करणाऱ्या मीडिया आउटलेट्सनंतर गांधींनी पेगासस मुद्द्यावर सरकारला टीका केल्याचेही पात्रांनी सांगितले.

OCCRP आणि राहुल एकच
पात्रा पुढे म्हणतात, ओसीसीआरपीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या कायदेशीर कारवाईला 'राजकीयदृष्ट्या प्रेरित' म्हटले होते. ओसीसीआरपी आणि राहुल गांधी हे दोन शरीर आणि एक आत्मा आहेत. आपले म्हणणे मांडताना पात्रांनी गांधींच्या काही लोकांसोबत झालेल्या भेटींचाही उल्लेख केला ज्यांनी भारताच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा आऱोप केला. ते म्हणाले की, हा निव्वळ योगायोग नाही, तर ही मिलीभगत आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताने पुढे जावे असे राहुल यांना वाटत नाही. राहुल गांधींना भारताची संसद चालवायची नाही. काँग्रेस 'फेक' बातम्यांमुळे कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Web Title: BJP On Rahul Gandhi: Rahul Gandhi is a traitor, defames the country by telling lies...BJP leader's serious accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.