२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एका ऐतिहासिक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असून प्रथमच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एका महिलेची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निर्मला सीतारामन, वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कोणत्या नेत्याच्या खांद्यावर सोपवली जाईल, हे लवकरच स्पष्ट होईल. भाजप नेते जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपला. परंतु, पक्षाने त्यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. आता पुढील काही दिवसांत नवीन अध्यक्षांची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला सितारामन यांच्यासह तीन प्रमुख महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
निर्मला सीतारमणदेशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शर्यतीत आघाडीवर मानल्या जात आहेत. अलिकडेच त्यांनी भाजप मुख्यालयात जेपी नड्डा आणि सरचिटणीस बीएल संतोष यांच्याशी बैठक घेतली. दक्षिण भारतातून येणे भाजपच्या दक्षिण विस्तार धोरणासाठी फायदेशीर मानले जाते.
डी. पुरंदेश्वरीआंध्र प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष डी पुरंदेश्वरी या एक अतिशय अनुभवी आणि बहुभाषिक नेत्या आहेत. त्यांना अनेक राजकीय पक्षांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांना ऑपरेशन सिंदूर सारख्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक मोहिमांचाही भाग बनवण्यात आले होते.
वनथी श्रीनिवासनतामिळनाडूच्या कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा वनथी श्रीनिवासन १९९३ पासून भाजपसोबत काम करत आहेत. त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. २०२२ मध्ये त्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या आणि असे करणाऱ्या पहिल्या तमिळ महिला नेत्या ठरल्या.