भाजपाच्या खासदारांनीही विचारले राम मंदिर कधी होणार? धीर धरण्याचा मिळाला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 17:43 IST2018-12-18T17:42:41+5:302018-12-18T17:43:11+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराचा मुद्दा तापवला असताना आता भाजपमधूनही थेट विचारणा होऊ लागली आहे.

भाजपाच्या खासदारांनीही विचारले राम मंदिर कधी होणार? धीर धरण्याचा मिळाला सल्ला
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराचा मुद्दा तापवला असताना आता भाजपमधूनही थेट विचारणा होऊ लागली आहे. मंगळवारी झालेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्येही खासदारांनी गृह मंत्री राजनाथ सिंह यांना मंदिर कधी बांधणार ते सांगा आधी, अशी विचारणा केली. यावर त्यांनी धीर धरण्याचा सल्ला दिला.
एका वृत्तसंस्थेला भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे रविंद्र कुशवाहा, हरिनारायण राजभर आणि काही अन्य खासदारांनी हा मुद्दा उचलून धरला. यावेळी राजनाथ सिंह समितीला मार्गदर्शन करत होते. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या बैठकीला उपस्थित नव्हते.
यावेळी राजनाथ सिंह यांनी खासदारांना शांत करताना, राम मंदिर सर्वांनाच हवे आहे. पण यासाठी थोडा धीर धरावा लागेल.
महत्वाचे म्हणजे भाजपाचा पाठीराखा असलेल्या संघासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिरसाठी कंबर कसली आहे. भाजपाने मंदिराच्या निर्माणासाठी संसदेत कायदा करावा अशी मागणीही जोर धरत आहे.