शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत जनता चौकीदार चोर है म्हणणारच; शॉटगन सिन्हांचा पुन्हा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 16:21 IST

मी आधी भारतीय जनतेचा आहे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा असल्याचं सिन्हा म्हणाले

कोलकाता: विरोधकांच्या महारॅलीला संबोधित करताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. मी आधी भारतीय जनतेचा आहे आणि मग भारतीय जनता पार्टीचा आहे, असा डायलॉग मारत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयांवर तोंडसुख घेतलं. विरोधकांची एकी शानदार असल्याचं म्हणत त्यांनी महाआघाडीतील अनेकांचं तोंडभरुन कौतुक केलं. चौकीदार ही चोर है, या विरोधकांच्या मोदींवरील टीकेवर सिन्हा यांनी भाष्य केलं. जोपर्यंत पंतप्रधान यावर बोलणार नाहीत, तोपर्यंत चौकीदार चोर है ही टीका ऐकून घ्यावीच लागेल, असं सिन्हा म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय पक्षाचा नव्हता. हा निर्णय मनमानीपणाचा नमुना होता. तो निर्णय पक्षाचा असता, तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना याची कल्पना असती. रातोरात हा निर्णय घेण्यात आला. देशवासीयांना रांगेत उभं करण्यात आलं. आपल्या माता-भगिनींनी चांगल्या हेतूनं ज्या पैशांची बचत केली, तेच पैसे बँकेत जमा करण्यासाठी त्यांना रांगा लावल्या लागल्या', अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी नोटाबंदीवरुन मोदींवर टीका केली.मोदींवर तुटून पडलेल्या सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं मात्र कौतुक केलं. तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांनी राहुल यांचं अभिनंदन केलं. 'नोटाबंदीच्या धक्क्यातून जनता सावरली नसताना, राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे सरकारनं गब्बर सिंह टॅक्स लागू करण्यात आला. यातून जनतेची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली,' असं म्हणत सिन्हा यांनी मोदींना लक्ष्य केलं. देशाला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन घडवण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. त्यामुळे लवकरच देशात बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी