शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा खासदारांच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाक्याने भाजल्यामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 12:49 IST

BJP Rita Bahuguna : चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फटाके पेटवताना त्यांची नात गंभीर जखमी झाली होती. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. भाजल्यानंतर तिला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीच तिला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला आहे.

रीता बहुगुणा जोशी या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती. फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली. उपचारांसाठी तिला लागलीच स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी चिमुकलीचं शरीर 60 टक्के भाजल्याचं सांगितलं. तसेच तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. 

जोशी यांच्या नातीला मंगळवारी सकाळीच एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फटक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि कोरोनाच्या संकटात रुग्णांना त्यामुळे असणारा धोका लक्षात घेऊन अनेक राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी फटाक्यांची विक्री होत आहे. बुलंदशहरच्या खुर्जामध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्या एक दुकानावर पोलिसांना छापा मारला. दुकान विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या विक्रेत्याच्या मुलीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

माझ्या वडिलांना सोडा म्हणत चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर आपटलं डोकं, Video व्हायरल

पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यावर चिमुकलीने त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटल्याची घटना समोर आली आहे. माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत ती मदतीसाठी याचना करत होती. पोलिसांनी चिमुकलीला पाहिलं. मात्र त्यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. हे पाहून चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर जोरजोरात डोकं आपटून घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या चिमुकलीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ती थांबली नाही. चिमुकलीचा गाडीवर डोकं आपटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाDiwaliदिवाळी