“राहुल गांधींना देशाबाहेर हाकलले पाहिजे”; भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 08:11 IST2023-03-13T08:11:17+5:302023-03-13T08:11:48+5:30

तुमची आई इटलीची असल्यामुळे तुम्ही आमच्या भारताचे नाहीत हे आम्ही मान्य केले आहे, असे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.

bjp mp pragya singh thakur slams congress rahul gandhi | “राहुल गांधींना देशाबाहेर हाकलले पाहिजे”; भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची टीका

“राहुल गांधींना देशाबाहेर हाकलले पाहिजे”; भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची टीका

भोपाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे, असे विधान भाजपच्या भोपाळ येथील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. लंडन दौऱ्यात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया  देताना त्या बोलत होत्या. भारतात विरोधी नेत्यांचे माईक बंद केले जातात, असे राहुल यांनी गेल्या सोमवारी ब्रिटनच्या खासदारांसोबत आयोजित एका कार्यक्रमात म्हटले होते.

‘परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही, असे चाणक्य यांनी म्हटले होते. राहुल गांधींनी त्यांचे हे विधान खरे असल्याचे सिद्ध केले आहे. तुम्हाला (राहुल गांधी) देशातील जनतेने निवडून दिले आहे आणि तुम्ही जनतेचा तसेच देशाचा अपमान करत आहात. तुमची आई इटलीची असल्यामुळे तुम्ही आमच्या भारताचे नाहीत हे आम्ही मान्य केले आहे’, असेही ठाकूर म्हणाल्या.

‘तुम्ही परदेशात बसून म्हणता की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही. मी अशा राहुल गांधींचा धिक्कार करते. त्यांना आता राजकारणात अजिबात संधी देऊ नये. त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे’, असेही ठाकूर म्हणाल्या. प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसने काही तासांपूर्वी ट्विटर हँडलवर राहुल गांधींचा लंडनमधील फोटो पोस्ट केला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp mp pragya singh thakur slams congress rahul gandhi