शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार? निशिकांत दुबेंनी आता IT मंत्र्यांना लिहिले पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 20:26 IST

या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला.

नवी दिल्ली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी लोकसभा सभापतींना पत्र लिहून तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. यानंतर आता निशिकांत दुबे यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. 

या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला. निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेच्या वेबसाईटच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, निशिंकात दुबे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने आरोप केला आहे की, महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेबसाइटवर आपली लॉगिन क्रेडेन्शियल्स मुंबईस्थित एका व्यावसायिक समूहासोबत शेअर केली आहेत.

अशाप्रकारे महुआ मोईत्रा यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर ते केवळ विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग ठरणार नाही तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करेल कारण याद्वारे भारत सरकारच्या वेबसाइटवर प्रवेश देण्यात आला होता, ज्यामध्ये संवेदनशील माहिती आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, निशिकांत दुबे यांनी वैष्णव यांना लिहिले की, तुम्हाला माहिती आहे की सरकारी वेबसाइट ऑपरेट करण्याची जबाबदारी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरची (NIC) आहे. ही संस्था कोणत्याही व्यक्तीचे लॉगिन डिटेल्स स्वतःकडे ठेवते. मी तुम्हाला आवाहन करतो की, महुआ मोईत्रा हजर नसलेल्या ठिकाणाहून त्यांचे लोकसभेचे अकाउंट अॅक्सेस करण्यात आले आहे की नाही, याची चौकशी करावी.

जर महुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेले आरोप खरे असल्याचे आढळले तर ते विश्वासार्हतेचे गंभीर गुन्हेगारी उल्लंघन तसेच भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन आहे. कारण यामुळे अनधिकृत व्यक्तींना सरकारी वेबसाइटवर अॅक्सेस मिळू शकतो, ज्यात गुप्त माहिती असू शकते. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका आहे, कारण लोकसभेच्या साइटवर अनधिकृत अॅक्सेस केल्याने संवेदनशील, गुप्त माहिती मिळू शकते, असे निशिकांत दुबे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आयपी अॅड्रेसचा तपास झाला पाहिजे - निशिकांत दुबेनिशिकांत दुबे यांनी हुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवर लॉगिन क्रेडेन्शियल्सचा आयपी अॅड्रेस शोधण्यासाठी तपास सुरू करण्याची मागणी केली. तसेच हुआ मोईत्रा यांचे लोकसभा अकाउंट अशा ठिकाणी अॅक्सेस केले होते की, जिथे त्या हजर नव्हता, यासंदर्भात सुद्धा चौकशी करण्यात यावी, असे निशाकांत दुबे यांनी म्हटले आहे. तसेच, निशिकांत दुबे यांनी या पत्राची प्रत आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनाही पाठवली आहे.

टॅग्स :ParliamentसंसदITमाहिती तंत्रज्ञानBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस