शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

"भारताचे तुकडे करण्यासाठी USAID ने खर्च केले ५ हजार कोटी?’’ भाजपा खासदाराचा गंभीर आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:12 IST

BJP MP Nishikant Dubey raised USAID Funding issue in Lok sabha: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी अमेरिकन संस्था यूएसएआयडी कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थाना निधी दिला गेल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी दुबे यांनी सरकारकडे केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेत अनेक क्षेत्रात उलथापालथ होत आहेत. अध्यक्षपदी येताच ट्रम्प यांनी अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटला (USAID) वेसण घातली आहे. यूएसएआयडीकडून उद्योगपती जॉर्ज सोरोसच्या संघटनांना २६ कोटी डॉलर मिळाल्याचा आरोप ट्रम्प यांनी आधी केला होता. सोरोसने या पैशांचा वापर भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांत अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि राजकीय क्षेत्रात ढवळाढवळ करण्यासाठी केला, असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. आता संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी अमेरिकन संस्था यूएसएआयडी कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थाना निधी दिला गेल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी दुबे यांनी सरकारकडे केली. यावेळी काँग्रेसचे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोसोर याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांचा निशिकांत दुबे यांनी पुनरुच्चार केला.

शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले की, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएसएआयडी संस्थेला पूर्णपणे बंद केलं आहे. ही संस्था अनेक वर्षांपासून विविध सरकारं पाडण्यासाठी आर्थिक ताकद लावत होती. निशिकांत दुबे पुढे म्हणाले की, यूएसएआयडीने जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनला भारताचे तुकडे पाडण्यासाठी  पाच हजार कोटी रुपये दिले होते की नाही. त्याने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले होते की नाही, हे आता विरोधी पक्षांनी सांगावं.

विविध संस्थांना यूएसएआयडीकडून पैसे दिले गेल्याचा आरोप करताना निशिकांत दुबे यांनी या सर्वाची चौकशी करण्याची  तसेच ज्यांनी देशाचं नुकसान करण्यासाठी पैसे घेतले आहेत, त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. दरम्यान, निशिकांत दुबे यांनी आरोप केल्यानंतर काँग्रेसचे सदस्यही आक्रमक झाले तसेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.  

टॅग्स :Indiaभारतlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसUnited Statesअमेरिका