शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही राजे आहोत, परंतु..."; भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या 'मुंबई'वरील विधानानं पुन्हा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:43 IST

देशात ४० ते ४५ टक्के कोळसा खाणी आणि खनिजे केवळ झारखंडकडे आहे. आधी बिहारकडे होतो जेव्हा एकखंड बिहार होते. आम्ही राजे आहोत

नवी दिल्ली - भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबई आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाष्य केले आहे. जर बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड नसेल तर मुंबईनं काय पाहिले असते? असा सवाल दुबे यांनी उपस्थित केला. त्याशिवाय डुबे डुबे कर मारेंगे या राज ठाकरेंनी दिलेल्या धमकीनंतर मी ४ वेळा मुंबईत आल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, बंगालचे लोक मुंबई, महाराष्ट्रात जातात आणि महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतील लोकांना वाटते हे लोक आमचा हिस्सा घेत आहेत. बिहारी कब्जा करताहेत असं त्यांना वाटते. आम्ही या देशातले सर्वात मोठे करदाते आहोत. जर मुंबई आणि महाराष्ट्र नसेल तर कदाचित देश चालणार नाही असेच कित्येक वर्षाच्या आंदोलनाचे कारण आहे. ही लढाई आहे असं त्यांनी सांगितले. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या वादावर भाष्य केले. 

परंतु पण माझं म्हणणं आहे, जर बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड नसते तर मुंबईनं काय पाहिले असते? स्टेट बँक ऑफ इंडिया संपूर्ण देशातून कर गोळा करते. एलआयसी, सेबी, एनएसई कर देते. टाटाचे मुख्यालयही तिथे आहे. जर झारखंड नसते तर टाटा कधी टाटा बनले नसते. बिर्ला नसते. या देशात ४० ते ४५ टक्के कोळसा आणि खनिजे केवळ झारखंडकडे आहे. आधी बिहारकडे होतो जेव्हा एकखंड बिहार होते. आम्ही राजे आहोत असं विधान खासदार निशिकांत दुबे यांनी केले. 

दरम्यान, आम्ही राजे आहोत परंतु आमचं दुर्दैव असं आहे की इथले वातावरण त्यांना सूट करत नाही. त्यामुळे सर्व लोकांनी त्यांची मुख्यालये मुंबईत बनवली आहेत आणि त्यांच्या कराच्या जोरावर तुम्ही स्वत:ला राजे समजता. या लोकशाहीत जनता राजा आहे. ते मत देतात म्हणून आम्ही निवडून येतो. गांधी-नेहरू कुटुंब राजे नाहीत. जी लढाई गांधी नेहरु कुटुंबासोबत आहे तीच भाषा मी राज ठाकरेंना वापरली अशा शब्दात भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. सोबतच राज ठाकरेंनी मला धमकी दिली त्यानंतर मी चार वेळा मुंबईत गेलो होतो. मी NCP नेत्यांनाही भेटलो असा उल्लेखही निशिकांत दुबे यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP MP Nishikant Dubey's Mumbai Remark Sparks Controversy Again.

Web Summary : Nishikant Dubey questioned Mumbai's significance without states like Bihar. He asserted these states are major taxpayers, contributing to Mumbai's economy. Dubey criticized Raj Thackeray and defended his visits to Mumbai despite threats.
टॅग्स :BJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबई