शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

राष्ट्रपतींच्या उदयपूर पॅलेस भेटीवर भाजप खासदाराचा आक्षेप; वडिलांची भेट न घेतल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:43 IST

उदयपूर सिटी-पॅलेसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीमुळे राजघराण्यातील सदस्य आणि भाजप खासदाराने नाराजी व्यक्त केली आहे.

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३ ऑक्टोबर रोजी उदयपूर दौऱ्यावर असताना सिटी पॅलेसला भेट दिल्याने नवा वाद सुरू झाला आहे. सिटी पॅलेसला भेट दिल्याबद्दल भाजप खासदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सिटी पॅलेस ही वादग्रस्त जागा असल्याचे खासदाराने म्हटलं. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींना लेखी पत्रही पाठवलं होतं. अधिकाऱ्यांना गोष्टींची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे. तरीही राष्ट्रपतींनी तिथे भेट दिली असे म्हणत भाजप खासदाराने आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गेल्या आठवड्यातच त्यांच्या उदयपूर भेटीचा एक भाग म्हणून मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी उदयपूरच्या माजी राजघराण्याच्या सिटी पॅलेसलाही भेट दिली, जिथे मेवाडच्या माजी राजघराण्याचे सदस्य डॉ. लक्ष्यराज सिंह मेवाड आणि त्यांच्या पत्नी निवृत्ती कुमारी यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा हे देखील उपस्थित होते. मात्र सिटी पॅलेसच्या भेटीवरुन राजसमंदच्या खासदार महिमा कुमारी आणि त्यांचे पती आणि नाथद्वाराचे आमदार विश्वराज सिंह यांनी प्रश्न उपस्थित करत हे आमच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध असल्याचे म्हटलं आहे.

"सिटी पॅलेसवरील न्यायालयीन स्थगिती आणि को-टेम्प्टचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. वादग्रस्त जागेच्या दौऱ्याची माहिती ओएसडी आणि प्रोटोकॉल ऑफिसरसह सर्व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती. राष्ट्रपतींची प्रतिष्ठा वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला सिटी पॅलेसमध्ये जाणे योग्य नाही," असे खासदार महिमा कुमारी म्हणाल्या. तसेच आमदार विश्वराज सिंह यांनीही याप्रकरणी रोष व्यक्त केला. वडील महेंद्र सिंह मेवाड यांची राष्ट्रपतींनी भेट घेतली नाही, असा आक्षेप विश्वराज सिंह यांनी नोंदवला आहे.

"सिटी पॅलेस ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता असून, त्यावर वाद असून न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे पत्राद्वारे त्यांना सांगण्यात आले. मालमत्तेच्या काही भागावर सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. ही जागा अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. अशा परिस्थितीत देशाच्या राष्ट्रपती आपल्या कौटुंबिक मालमत्तेवर आल्या आणि घरातील व कुटुंबातील ज्येष्ठांना न विचारता किंवा न भेटता निघून गेल्या. हे तर राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे," असं विश्वराज सिंह  मेवाड यांनी म्हटलं.

दरम्यान, मेवाडच्या राजघराण्याचे सदस्य डॉ. लक्ष्यराज सिंह यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती मुर्मू सिटी पॅलेसमध्ये पोहोचले होत्या. लक्ष्यराज सिंह यांची पत्नी निवृत्ती कुमारी या ओडिशाच्या राजघराण्यातील आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी सिटी पॅलेसला भेट दिली होती. उदयपूर आणि ओडिशामधील संबंधांवर दोघांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि लक्ष्यराज सिंह यांच्या पत्नी निवृत्ती कुमारी या मूळच्या ओडिशाच्या आहेत. लक्ष्यराज सिंह यांचे सासरे कनक वर्धन सिंह देव सध्या ओडिशा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि सासू संगीता कुमारी सिंह देव या बालंगीर लोकसभेच्या खासदार आहेत.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूRajasthanराजस्थानBJPभाजपा