शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण करू नका, मणिपूरच्या घटनेने देशातील १४० कोटी जनतेची मान खाली गेली - गौतम गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:41 IST

manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

नवी दिल्ली : हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर राज्य सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा देशाला लाजवेल अशी घटना घडली. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही जण २ महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढत असल्याचे दिसते. धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली असून हेरोदास मेईतेई असे आरोपीचे नाव आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. तर राजकारण न करण्याचे आवाहन सत्ताधारी करत आहेत.

यावर बोलताना माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान भाजपाखासदारगौतम गंभीरने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच झालेल्या घटनेवर राजकारण न करण्याचे आवाहन देखील गंभीरने केले.

गंभीरनं नेमकं काय म्हटले?"मणिपूरमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे. यामुळे देशातील १४० कोटी जनतेची मान खाली गेली असून हा केवळ मणिपूरशी संबंधित विषय नसून संपूर्ण देशाचा आहे. त्यामुळे त्यावर राजकारण होता कामा नये", असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देशमणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारGautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाMember of parliamentखासदारsexual harassmentलैंगिक छळ