शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये नाटक सुरूच, बहुमत चाचणीआधीच विधानसभेचे कामकाज स्थगित, भाजापाचा सभागृहात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 20:13 IST

कर्नाटक विधानसभेतील राजकीय नाटक अद्याप सुरूच आहे.

बंगळुरू - कर्नाटक विधानसभेतील राजकीय नाटक अद्याप सुरूच असून, आज बहुमत चाचणी वेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले आहे. दरम्यान, बहुमत परीक्षण करण्याआधीच सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आल्याने भाजपा आमदारांनी विधानसभेच्या सभागृहातच धरणे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी उत्तर द्यावे आणि मतदान घ्यावे अशी मागणी भाजपा आमदारांनी केली आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी बहुमत चाचणीसाठी १८ जुलै या तारखेची घोषणा केली होती. दरम्यान, आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर भाजपा आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये गरमागरम चर्चा झाली. यादरम्यान, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत विधानसभा अध्यक्षांना विश्वास प्रस्तावावरील चर्चा सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली त्यानंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून गुरुवारीच बहुमताची चाचणी घेण्यात यावी, असा सल्ला दिला. त्यावर रात्रीचे १२ वाजले तरी चालतील पण आजच बहुमत परीक्षण व्हावे, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी केली.मात्र असे असतानाही विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी बहुमत चाचणी न घेताच विधानसभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाच्या आमदारांनी विधानसभेतच ठिय्या देत रात्रभर आंदोलन करण्याची घोषणा केली.  

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)