BJP MLA Vishwas Sarang Did Not See The Photo Of Rahul Priyanka's Rakshabandan | 'राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा'
'राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा'

भोपाळ - रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार विश्वास सांरग यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी यांच्यासह नेहरु गांधी कुटुंबावर जोरदार टीकास्त्र सोडलं. 

भाजपा आमदार विश्वास सारंग यांनी सांगितले की, असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला नाही. जर तुमच्यापैकी कोणी असा फोटो बघितला असेल तर फोटो मला दाखवा, मी तुम्हाला बक्षिस देईन असं सारंग यांनी जाहीर केलं. 

तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राखी बांधण्यावरुन त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते कधीही रक्षाबंधन साजरा करत नाहीत. ते लोक इटलीची प्रथा मानतात. कमलनाथ यांच्यावर टीका करताना त्यांनी गांधी कुटुंबावर सारंग यांनी तोंडसुख घेतलं. इटलीची प्रथा-परंपरा, संस्कृती आत्मसात करणारे सत्तेत आल्यास असेच चित्र पाहायला मिळेल असा टोला विश्वास सारंग यांनी लगावला. 

दरम्यान रक्षाबंधन हा सण हिंदू संस्कृतीशी जोडला आहे. त्याच्याशी काँग्रेस नेत्यांना काहीही देणंघेणं नाही. हे लोक फक्त राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे सांगतील तेच करणारे आहेत असं सांगत भाजपाच्या कार्यकाळात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानी मोठं आयोजन केलं जात होते. मोठ्या संख्येने महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी यायच्या. मात्र काँग्रेसच्या काळात असा कोणताही उत्साह, जल्लोष पाहायला मिळाला नाही असा टोला विश्वास सारंग यांनी लगावला. 

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रक्षाबंधन साजरा केल्याचा फोटो नाही. हिंदू सण-उत्सव गांधी कुटुंब साजरं करतं की नाही याची काही कल्पना नाही. फक्त निवडणुका येतील तेव्हा गांधी कुटुंब मंदिरात जाऊन फोटो काढण्याचं काम करतं अशी टीका विश्वास सारंग यांनी केली. 

Web Title: BJP MLA Vishwas Sarang Did Not See The Photo Of Rahul Priyanka's Rakshabandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.