शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर केला आत्मदनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 14:18 IST

भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देकर्नाटकमधील भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला अवैध वाळू उत्खननाप्रकरणी सुरू असलेल्या वादातून घडला प्रकार संबंधित आमदाराने जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर सोडवून घेण्यासाठी पोलीस सब इन्स्पेक्टरवर दबाव आणल्याचा पोलिसांचा आरोप

शिमोगा -  अवैध वाळू उत्खननाप्रकरणी सुरू असलेल्या वादातून कर्नाटकमधील भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. जी. शेखर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा आमदाराचे नाव असून, ते चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्ग मतदारसंघातील आमदार आहेत. अवैधपणे उत्खनन केलेली वाळू घेऊन जात असलेले चार ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले होते. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती. शेखर यांनी जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर सोडवून घेण्यासाठी पोलीस सब इन्स्पेक्टरवर दबाव आणल्याचा आरोप पोलिसांनी एक पत्रक प्रसिद्ध करून केला होता.  दरम्यान, पोलिसांनी आमदारांचा दबाव झुगारून लावल्यानंतर ते रात्री 9.30 वाजता पोलीस ठाण्याजवळ आले. तसेच त्यांनी स्वत:वर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेट्रोल त्यांचे डोळे आणि कानात केले. तसेच पेटवून गेल्याने ते काही प्रमाणात भाजले आहेत. त्यांची प्रकृतीस स्थिर आहे. मात्र त्यांना आराम करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.  आमदार जी. शेखर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमवारी होसदुर्ग येथे आंदोलन केले. तसेच सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी नदीमधील वाळू पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी एका पत्रकामधून असिस्टंट कमिशनर यांच्याकडे केली आहे. या प्रकारानंतर कर्नाटक भाजपाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी शेखर यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. तर पोलीस हे सर्वसामान्यांना त्रस्त करत असून, भाजपाचे कार्यकर्ते आणि समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोप शेखर यांनी केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणPoliceपोलिस