शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"ताजमहालचं नाव बदलून राम महल केलं जाईल"; भाजपा नेत्याचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 08:40 IST

BJP MLA Surendra Singh And Taj Mahal : भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे लोकप्रिय आहेत. सिंह हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह (BJP MLA Surendra Singh ) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे लोकप्रिय आहेत. सुरेंद्र सिंह हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ताजमहालचं (Taj Mahal) नाव बदलून ते राम महल (Ram Mahal) केलं जाणार आहे असा मोठा दावा त्यांनी आता केला आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. आग्रा येथील ताजमहाल हे शिवकालीन मंदिर होते आणि योगी प्रशासनात लवकरच त्याचे नाव राम महाल असं ठेवण्यात येईल असं सिंह यांनी म्हटलं आहे. 

सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केलं आहे. "महाराजांचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत दाखल झाले आहेत. समर्थ रामदासस्वामींनी ज्याप्रमाणे भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिले आहे" असं म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यांनी पत्रकारांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. सिंह यांनी मुरादाबादमधील पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. 

"केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील"

"पत्रकारांवर लाठी वापरणारे समाजवाद्यांचे खरे रूप समोर आले आहे. पण योगीजींच्या राजवटीत हे खपवून घेतले जाणार नाही. देशद्रोही मानसिकता असणार्‍या लोकांना कोणत्याही प्रकारची पसंती दिली जाणार नाही. केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील" असं देखील भाजपा आमदाराने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. याच दरम्यान सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं. 

"मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. 

टॅग्स :Taj MahalताजमहालBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजyogi adityanathयोगी आदित्यनाथ