शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 18:24 IST

मध्य प्रदेशात भाजप आमदाराच्या मुलाने पुजाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Madhya Pradesh Crime:मध्य प्रदेशात भाजप आमदाराच्या मुलाने मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री मंदिरात दर्शनाला विरोध केल्यानंतर भाजप आमदाराने पुजाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप आमदाराच्या मुलाने मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील चामुंडा देवी मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला केला. आमदाराचा मुलगा त्याच्या मित्रांसह मध्यरात्री दर्शनासाठी आला होता. मात्र मंदिराचे दार उघडण्यावरून त्याच्या साथीदारांचा पुजाऱ्याच्या मुलाशी वाद झाला. यानंतर हा सगळा प्रकार घडला.

भाजप आमदार गोलू शुक्ला यांचा मुलगा रुद्राक्ष शुक्ला याच्यावर देवासमधील चामुंडा देवी मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. रुद्राक्ष त्याच्या मित्रांसह माता टेकरी मंदिरात पोहोचला आणि मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी पुजाऱ्यावर दबाव आणू लागला. पुजाऱ्याने यासाठी नकार दिला असता  त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. 

शुक्रवारी रात्री १२.४० वाजता इंदूरचे आमदार गोलू शुक्ला यांचा मुलगा रुद्राक्ष शुक्ला १० ते १२ लाल दिव्याच्या वाहनांच्या ताफ्यासह मंदिरात पोहोचला. मंदिर बंद असतानाही त्यांनी पुजाऱ्याच्या मुलाला जबरदस्तीने गेट उघडण्यास सांगितले. यानंतर, पुजाऱ्याचा मुलगा उपदेश याने नियमांचे कारण देत गेट उघडण्यास नकार दिला. यावर रुद्र शुक्लाचा मित्र जितेंद्र रघुवंशी याने उपदेशला शिवीगाळ करून मारहाण केली. पुजारी महेश यांनी आरोप केला की त्यांच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी पुजारी महेश यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र रघुवंशी याच्याविरुद्ध बीएनएस कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला. एफआयआरमध्ये फक्त जितेंद्रचे नाव आहे. भाजप आमदाराचा मुलगा रुद्र शुक्ला यांचे नाव त्यात नाही. तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच मला एक फोन आला आणि प्रकरण मिटवण्यास सांगितले. पण मी  या प्रकरणात तडजोड करणार नाही, असे पुजाऱ्याने सांगितले.

दरम्यान, रुद्राक्ष शुक्लाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये डझनभर गाड्या मंदिराकडे जाताना दिसत आहेत. या गाड्यांवर बेकायदेशीर हॉर्नही लावण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र रघुवंशी याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलीस मंदिराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिस