शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

भाजपाची बुधवारी दिल्लीत बैठक : नाराजी वाढू न देण्यावर मंथन, २०१९च्या निवडणुकीची पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:52 PM

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी आणि खास करून केंद्रातील व भाजपाशासित राज्यांमधील जनतेमध्ये सरकारविषयी जाणवू लागलेली रोष व भ्रमनिरासाची भावना दूर करण्यास काय करावे यावर विचारमंथन करण्यासाठी

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी आणि खास करून केंद्रातील व भाजपाशासित राज्यांमधील जनतेमध्ये सरकारविषयी जाणवू लागलेली रोष व भ्रमनिरासाची भावना दूर करण्यास काय करावे यावर विचारमंथन करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाने येत्या बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत एक बैठक बोलाविली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा बैठकीच्या सुरुवातीस मार्गदर्शन करतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोप करतील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. भाजपाचे १४ राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत तर बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाचे उपमुख्यमंत्रीही आहेत. ही बैठक दिवसभर चालेल.मोदी सरकार सन २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यापासून दरवर्षी अशी बैठक घेण्याचा पायंडा पडला असला तरी येत्या वर्षभरात अनेक राज्यांमध्ये होणाºया विधानसभा निवडणुका व २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर यंदाच्या बैठकीस विशेष महत्वाचे मानले जात आहे. म्हणूनच पक्षनेतृत्वाकडून एक पाच मुद्द्यांचे टिपण पाठविण्यात आले असून त्या अनुषंगाने पूर्ण तयारी करून बैठकीस येण्यास सांगण्यात आले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने नव्याने सत्ता काबिज केली किंवा सत्ता कायम राखली. असे असले तरी प्रस्थापित सत्ताधाºयांविषयी कालांतराने दिसून येणारी नाराजी दिसू लागली आहे. ती दूर करणे व निदान वाढू न देणे हे भावी यशासाठी आवश्यक असणार आहे, याची जाणीव ठेवूनच या बैठकीत त्यादृष्टीने विशेष विचारमंथन होणे अपेक्षित आहे. केंद्राने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे नेणे, या योजनांची अमलबजावणी अधिक जोरकसपणे करणे, १० कोटी कुटुंबांना आरोग्य विमा देण्याची महत्वाकांक्षी योजना, लोकसभा-विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार या सर्व मुद्द्यांवर या एकदिवसीय बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.योजनांचा अहवाला मागविला-समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी केंद्राने जन-धन, मुद्रा, उज्ज्वला, तसेच गृहनिर्माणाशी संबंधित योजना राबविल्या आहेत त्यांची राज्यात अमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याबद्दलचाही अहवाल भाजपाने आपल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून मागविला आहे. निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी समित्या स्थापन कराव्यात व त्यांच्यामार्फत या मुद्द्याची जनतेत अधिकाधिक चर्चा कशी होईल हे पाहावे.न जिंकता आलेल्या ‘त्या' १२० जागांवर अधिक भरभाजपाने स्वबळावर बहुमत मिळविले असले तरी लोकसभेच्या पक्षाला कधीही जिंकता आल्या नाहीत अशा १२० जागा आहेत. या जागा जिंकण्यासाठी नेमकी कोणती रणनीती अवलंबावी यावरही या बैठकीत चर्चा होईल.