शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
3
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
5
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
6
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
7
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
8
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
9
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
10
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
11
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
12
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
13
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
14
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
15
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
17
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
18
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
19
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
20
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

भाजपा नेत्याची भरदिवसा हत्या; आधी गोळ्या झाडल्या मग तलवारीनं कापला गळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 12:24 PM

राजस्थानमधील प्रतापगड येथे भरदिवसा भाजपाच्या एका नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या काही अज्ञातांनी भाजपा नेते समरथ कुमावत यांची शनिवारी हत्या केली.

जयपूर - राजस्थानमधील प्रतापगड येथे भरदिवसा भाजपाच्या एका नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या काही अज्ञातांनी भाजपा नेते समरथ कुमावत यांची शनिवारी हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी सुरुवातीला कुमावत यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर तलवारीनं त्यांचा गळा कापला.  प्रतापगड शहरापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेत कुमावत यांचा जागीच मृत्यू झाला. कुमावत यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले.

या घटनेचा भाजपाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. लवकरात लवकर आरोपींना अटक करुन, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.  दरम्यान, कुमावत यांची कोणाही सोबत वैर नव्हते, ते भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. 

तर दुसरीकडे, काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. 'भाजपाच्या समरथ कुमावत यांच्या क्रूर हत्येची मी निंदा करतो. आरोपींना गंभीर स्वरुपात शिक्षा केली गेली पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती हा चिंतेचा विषय आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे. 

 

टॅग्स :MurderखूनBJPभाजपाRajasthanराजस्थान