600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 16:31 IST2018-11-11T16:09:37+5:302018-11-11T16:31:34+5:30
सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे.

600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक
बंगळुरू - सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे. जनार्दन रेड्डी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला पैशांची अवैध पद्धतीने देवाण घेवाण करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. रेड्डी यांच्याबरोबरच त्यांचा सहकारी महफूझ अली खान यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने जनार्दन रेड्डी यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
#Karnataka: Janardhan Reddy who has been arrested by Bengaluru Central Crime Branch, in connection with Ambident Group alleged bribery case, being taken for medical examination. pic.twitter.com/tQclusCO1q
— ANI (@ANI) November 11, 2018
जनार्दन रेड्डी हे शनिवारी एजन्सीसमोर हजर झाले होते. दरम्यान, क्राइम ब्रँचचे सीपी आलोक कुमार यांनी सांगितले की सबळ पुराव्यांच्या आधारावर रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. आता रेड्डी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येईल. तसेच जप्त करण्यात आलेले पैसे गुंतवणुकदारांना दिले जातील.
Bengaluru Central Crime Branch (CCB) has also arrested Ali Khan, a close aid of Jaanardhan Reddy.
— ANI (@ANI) November 11, 2018
रेड्डी आणि खान यांनी अँबिडेट मार्केटिंगकडून 18 कोटी रुपये किमतीचे सुमरा 57 किलो सोने घेतले होते. हे सोने प्रवर्तन निर्देशालयाच्या अधिकाऱ्यांपासून अँबिडेंटचे प्रमोटर सय्यद अहमद फरीद यांना चौकशीत ढिलाई मिळवून देण्यासाठी घेण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात क्राइम ब्रँचने रेड्डी आणि खान यांना रविवारी चौकशीसाठी नोटीस पाठवले होते.