शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:31 IST

अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे.

नवी दिल्ली: परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर, राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. यावरून आता भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनीही गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल, असे बापट यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader Girish Bapat target to Sharad Pawar and Anil Deshmukh in delhi)

अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हे गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणीही बापट यांनी यावेळी केली. याशिवाय, कोण कुठे होते यापेक्षाही माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हे महत्वाचे, असेही बापट म्हणाले.

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

त्यांना दोन तास दिले तरीही ते कमीच -यावेळी, सभागृहात शिवसेना खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. विनायक राऊत यांना वेळ मिळाला होता. मात्र, त्यांना दोन तास दिले तरीही ते कमीच पडतील, असा टोलाही बापटांनी यावेळी राऊत यांना लगावला. 

हे तर सरकार पाडण्याचं षडयंत्र -  नवाब मलिक"अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांत कोणतही तथ्य नाही. ते २७ फेब्रुवारीपर्यंत कुणालाही भेटलेले नाहीत. फडणवीस केवळ बेछुट आरोप करून सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहेत. राजकीयदृष्ट्या हे सरकार पाडता आलं नाही म्हणून आता अधिकाऱ्यांचा वापर करुन ते सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत आहेत", असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. 

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

पोलिसांच्या बदल्यात गृहमंत्री  करत नाहीपोलिसांच्या बदल्यांच्या संदर्भात फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर करत असलेले आरोप बाळबोध असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. "पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी एक आयपीएस अधिकाऱ्यांची समिती असते. कोणताही गृहमंत्री थेट पोलिसाची बदली करत नाही. फडणवीस फक्त खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. दिल्लीत जाऊन गृहसचिवांना पुरावे देण्याची भाषा ते करत आहेत. त्यांना फक्त दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची बदनामी करायची आहे इतकाच त्यांचा उद्देश आहे", असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे.  

टॅग्स :girish bapatगिरीष बापटSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस