भररस्त्यात महिलेसोबत अश्लील चाळे, भाजपाचा तो नेता अखेर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 20:38 IST2025-05-25T20:38:06+5:302025-05-25T20:38:34+5:30
Madhya Pradesh Crime News: भररस्त्यात महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील भाजपाचा स्थानिक नेता मनोहर धाकड वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मनोहर धाकड हा फरार होता. आता तो पोलिसांच्या हाती लागला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

भररस्त्यात महिलेसोबत अश्लील चाळे, भाजपाचा तो नेता अखेर अटकेत
भररस्त्यात महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील भाजपाचा स्थानिक नेता मनोहर धाकड वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून मनोहर धाकड हा फरार होता. आता तो पोलिसांच्या हाती लागला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
धाकड याला भानपुरा पोलिसांनी अटक केली असून, तोंडावर काळा कपडा घालून पोलीस ठाण्यात आणले. आता पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. रस्त्यावर महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मनोहर धाकड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच या व्हिडीओमध्ये देशात आणि मध्य प्रदेशमध्ये सत्ता असलेल्या भाजपाची नाचक्की झाली होती.
मनोहरलाल धाकड याचा एका महिलेसोबत भर रस्त्यात अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना १३ मे रोजी मुंबई-दिल्ली महामार्गावर घडली होती. तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.