शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवताहेत; नेतृत्त्वावर टीका केल्यानं भाजपा नेत्याची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 08:07 IST

भाजपा नेत्याची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर थेट टीका

लखनऊ: पक्ष नेतृत्त्वावर थेट टीका केल्यानं भाजपाकडून वरिष्ठ नेत्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपा नेतृत्त्वाचा उल्लेख गुजराती चोर म्हणून केल्यानं भाजपानं लखनऊमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते आय. पी. सिंह यांचं निलंबन केलं. सिंह यांनी ट्विटरवरुन भाजपा नेतृत्त्वावर कडाडून टीका केली होती. भाजपानं पंतप्रधान निवडला आहे की प्रचारमंत्री असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर तोफ डागल्यानं आय. पी. सिंह यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं. यावरुनही त्यांनी पक्षाला लक्ष्य केलं. 'सहा वर्षांसाठी माझं निलंबन करण्यात आल्याची माहिती मला माध्यमांमधून मिळाली. मी माझ्या आयुष्यातील तीन दशकं पक्षासाठी दिली. मात्र केवळ खरं बोललो म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आली. खरं बोलणं हा गुन्हा असेल, तर पक्षातील लोकशाही संपली आहे,' अशा शब्दांमध्ये सिंह यांनी त्यांच्यावरील कारवाईवर भाष्य केलं. 

पंतप्रधान मोदींसह भाजपाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार ट्विटरवर नावापुढे चौकीदार लावत असताना सिंह यांनी त्यांच्या नावपुढे ऊसूलदार शब्द जोडला आहे. 'मी क्षत्रिय समाजाचा आहे. दोन गुजराती चोर हिंदी पट्ट्यातील लोकांना गेल्या पाच वर्षांपासून मूर्ख बनवताहेत,' अशा शब्दांमध्ये सिंह यांनी भाजपा नेतृत्त्वाला लक्ष्य केलं. 'आमचा उत्तर प्रदेश गुजरातपेक्षा पाचपट मोठा आहे. उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था पाच लाख कोटींची आहे. तर गुजरातची अर्थव्यवस्था 1 लाख 15 हजार कोटींची आहे. या परिस्थितीत ते खाणार काय आणि काय विकास करणार?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. देशाचा पंतप्रधान टी-शर्ट आणि चहाचे कप विकतो. हे कितपत चांगलं वाटतं?, असा प्रश्न त्यांनी ट्विटमधून विचारला. 'भाजपानं विचारसरणीतून लोकांच्या मनात स्थान मिळवलं. केवळ टी-शर्ट आणि मिस्ड कॉल देऊन कार्यकर्ते तयार होत नाहीत,' अशी टीका सिंह यांनी केली. याशिवाय त्यांनी एका ट्विटमध्ये समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचं कौतुकही केलं आहे. 'आझमगढमधून अखिलेश यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. यामुळे धर्म आणि जातीचं राजकारण संपेल,' अशा शब्दांमध्ये त्यांनी अखिलेश यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाGujaratगुजरातUttar Pradeshउत्तर प्रदेश